• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LIC चे हे दोन प्लान जे तुम्हाला देतील जीवनभर कमाई, उमंग आणि उत्सव कोणता बेस्ट ?

April 19, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येकाला असे वाटते की त्याची जीवनभराची कमाई सुरक्षित जागी गुंतवावी. त्यास शेअरबाजारातील चढउताराची कोणतीही भीती नसावी. एक निश्चित फिक्स्ड इन्कम मिळत रहावी आणि म्हातारपण सुखात जावे. जर तुम्हीही असा सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असाल तर भारतीय जीवन बीमा निगम (LIC) चे दोन प्लान ‘जीवन उमंग’ आणि ‘जीवन उत्सव’ तुमच्या साठी चांगला पर्याय होऊ शकतात. हे दोन्ही Whole Life Plan असून ते तुम्हाला १०० वयापर्यंत रिस्क कव्हर देतात. मात्र, या दोन पॉलिसीतील कोणती चांगली दमदार आहे ? चला संपूर्ण गणित पाहूयात….

जीवन उमंग

एलआयसीचा जीवन उमंग प्लान त्या गुंतवणूकदारांसाठी डिझाईन केला आहे. ज्यांना दीर्घकाळासाठी एक सुरक्षित गुंतवणूक हवी आहे. या पॉलिसीला ० ते ५५ वर्षांचा कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. सुरुवातीला किमान २ लाख रुपयांच्या सम एश्योर्डपासून होते. तर कमाल गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. यात तुम्ही तुमच्या सुविधेनुसार १५,२०,२५ वा ३० वर्षांपर्यंत प्रीमियम भरण्याची सवलत मिळते.

या प्लानची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे पेआऊट आहे. जशी तुमची प्रीमियम भरण्याचा कालावधी संपतो, तुम्हाला कोणत्याही गॅप शिवाय दरवर्षी सम एश्योर्डचा ८ टक्के वाटा जीवनभर खात्यात मिळत राहातो. अचनाक पैशांची गरज पडली तर पॉलिस सुरु होण्याच्या एक वर्षांनंतर कर्ज घेऊ शकता किंवा यास सरेंडर करु शकता. तसेच पॉलीसी होल्डरचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला बेसिक सम एश्योर्ड सोबत बोनस आणि फायनल एडीशन बोनस (FAB)चा मोठा फंड मिळेल.

जीवन उत्सव

जर तुम्ही कमी वेळेपर्यंत प्रीमियम भरुन जास्त रेग्युलर इन्कम मिळवू इच्छीता तर ‘जीवन उत्सव’ एक चांगला पर्याय आहे. यात ० ते ६५ वर्षाच्या व्यक्ती लाभ घेऊ शकतो. याचा न्यूनतम सम एश्योर्ड ५ लाख रुपये आहे. या प्लानचा प्रीमियम देण्याचा अवधी केवळ ५ ते १६ वर्षांच्या दरम्यान आहे.

परताव्याच्या बाबतीत ही पॉलिसी खूपच आकर्षक आहे. प्रीमियम भरण्याचा अवधी पूर्ण झाल्याच्या दोन वर्षांनंतर प्रत्येक वर्षी तुमच्या खात्यात सम एश्योर्डचा १० टक्के हिस्सा येणे सुरु होते. यात लोन आणि सरेंडरची सुविधा दोन वर्षांनंतर मिळतो. जर पॉलिसी होल्डरचा मृ्त्यू झाला तर कुटुंबाला सम एश्योर्ड सोबत गारंटीड एडीशनचे पैसे मिळतात.

कसा मिळतो फायदा ?

समजा तुमचे वय ३५ वर्षे आहे. आणि तुम्ही तुमच्या ८ वर्षांच्या मुलाच्या सुरक्षित भविष्यासाठी एक १० लाख रुपयांची सम एश्योर्डची पॉलिसी घेत आहात. तूम्ही १५ वर्षांचा प्रीमियम टर्म निवडला आहे.

जर तुम्ही ‘जीवन उमंग’ निवडताय, तर तुम्हाला वार्षिक ८१,७७४ रुपयांचा प्रीमियम द्यावा लागेल.१५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १२.२६ लाख रुपये होईल. जेव्हा तुमचा मुलगा २३ वर्षांचा होईल तेव्हापासून १०० वयापर्यंत त्याला दर वर्षी ९६ हजार मिळत जाईल. जर ५० व्या वयात पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर नॉमिनीला बोनस मिळून जवळपास ५६ लाख रुपयांचा मोठा फंड मिळेल.

जर तुम्ही ‘जीवन उत्सव’ची निवड केली असेल तर तुमची वार्षिक हप्ता घटेल आणि तो ६६,१७३ रुपये होईल. १५ वर्षात तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ९.९२ लाख रुपये होईल.त्यानंतर मुलगा २५ वर्षांचा झाल्यानंतर त्याला १०० वयापर्यंत प्रत्येक वर्षी १ लाख रुपये मिळतील. ५० वर्षांच्या वयात मृत्यू झाल्यास नॉमिनीला सुमारे १६ लाख रुपयांचा डेथ बेनिफिट मिळेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DCM Eknath Shinde | लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी अपडेट
  • तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर
  • भीषण स्फोटाने तामिळनाडू हादरलं! 16 जणांचा होरपळून मृत्यू, कारखान्यात खळबळ
  • ओडिशामध्ये भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचे भूमिपूजन; AI, 5G आणि संरक्षण तंत्रज्ञानाला मोठा चालना
  • Yavatmal | धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in