
फुटबॉलविश्वात अमाप पैसा आहे, हे काही नव्याने सांगण्याचं कारण नाही. एका खेळाडूच्या ट्रान्सफरसाठी फुटबॉल क्लब आता हजारो कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी ठेवतात. याबाबतची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. कारण या क्लबची तयारी कोट्यवधींच्या घरात आहे. (Photo: Getty Images)
इंग्लंडमध्ये एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. दिग्गज फुटबॉल क्लब लिव्हरपूल एफसीने एक डील केलं आहे. यामुळे पाच वर्षात 300 मिलियन पाउंड म्हणजेच 3829 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. (Photo: Getty Images)
इंग्लंडच्या सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब लिव्हरपूल आणि टर्किश एअरलाइंस यांच्यात मुख्य क्लब पार्टनरशिप डील आहे. हा करार पाच वर्षांसाठी आहे. त्याची सुरूवात 2027-28 पर्वापासून होणार आहे. (Photo: Getty Images)
करारानुसार, लिव्हरपूल एफसीच्या मेन्स, वुमन्स आणि अकादमी संघाच्या मॅच जर्सीमध्ये सर्वात पुढे टर्किश एअरलाइन्सचं नाव असेल. क्लबला प्रत्येक पर्वासाठी 60 मिलियन पाउंड म्हणजेच 765 कोटी मिळेल. प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वात मोठी डील आहे. (Photo: Getty Images)
जगातील सर्वात प्रसिद्ध क्लबमध्ये असलेला लिव्हरपूल जर्सीवरील नाव 17 वर्षांनी बदलणार आहे. 2010 पासून स्टँडर्ड चार्टर्ड ही लिव्हरपूलचा मेन स्पॉन्सर आहे. जर्सीवर नाव काढल्यानंतरही एलएफसी आणि स्टँडर्स चार्टर्डच्या ग्लोबल पार्टनरशिप कायम राहिल. (Photo: Getty Images)




Leave a Reply