• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये…मोठी अपडेट समोर!

July 1, 2026 by admin Leave a Comment


Ladki Bahin Yojana Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यभरातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. दरम्यान, आता जुलै महिना सुरू झाला आहे. परंतु अजूनही महिलांना जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळेच जून महिन्यासोबतच जुलै महिन्यांच्या लाभाचाही महिलांना प्रतीक्षा लागली आहे. हे पैसे कधी बँक खात्यावर येणार असे विचारले जात आहे.

मार्च-एप्रिल महिन्याचे मिळाले 3000 रुपये

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये पाठवले जातात. सरकारने याआधी मार्च आणि एप्रिल अशा एकूण दोन महिन्याचे पैसे पात्र महिलांना एकत्रच पाठवले होते. म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना एकत्रच 3000 रुपये मिळाले होते. त्यानंतर मे महिन्याचा लाभही महिलांना देण्यात आला. मधल्या काळात ई-केवायसी न करणे, पात्रता निकषात न बसणे या कारणांमुळे 80 लाख लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्यात आला. आता जून महिन्याचा लाभ मिळणे बाकी आहे.

महिलांना जुन-जुलै महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का?

दरम्यान, आता जून महिना संपला असून जुलै महिना सुरू झाला आहे. जून महिना संपलेला असूनही लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. म्हणूनच मार्च आणि एप्रिल महिन्याप्रमाणे यावेळीही जून आणि जुलै महिन्याचे एकूण 3000 रुपये महिलांना एकत्र दिले जाणार का? असे विचारले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 12 ते 15 तारखेपर्यंत दिले जातील. हा फक्त अंदाज आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर जुलै महिन्याच्या पैशांबाबत अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही. म्हणजेच जून आणि जुलै महिन्याचे पैसे महिलांना एकत्रित मिळणार की नाही, याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. सध्यातरी फक्त जून महिन्याचेच पैसे दिले जातील असे सांगितले जात आहे..



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गिरगावमध्ये वेश्या व्यवसायात अडकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेमकी कोण? एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा!
  • ‘आप’मधून भाजपात गेलेल्या राघव चड्ढा यांना हायकोर्टाचा मोठा दणका, नेमकं प्रकरण काय?
  • घरातील सोफा आणि टीव्ही योग्य दिशेला ठेवल्यास सुख-समृद्धी वाढते? वास्तुशास्त्र काय सांगते
  • एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं.. ‘एक होतं माळीण’चा थरकाप उडवणारा टीझर
  • Erling Haaland: एर्लिंग हालँड नॉर्वेच्या विजयाचा शिल्पकार, सलग 13 सामन्यात केली अशी कामगिरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in