• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin Installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, सरकारने पेटारा उघडला, खात्यावर 1500 पडणार!

August 13, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील हजारो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र राज्यातील महिलांना अद्याप जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. आता या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने पैशांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

344 कोटींचा निधी मंजूर

लाडक्या बहि‍णींच्या आगामी हप्त्यासाठी जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या वितरणास शासनाने मान्यता दिली आहे. आता आगामी काळात लवकरच हा निधी पात्र महिलांमध्ये केला जाणार आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप महिला आणि बालविकास विभागाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार याची उत्सुकता पात्र महिलांना लागली आहे.

लाडक्या बहि‍णींना 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

लाडक्या बहि‍णी जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आता सरकारने या हप्त्यासाठी निधीची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या 2 दिवसांमध्ये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

अनेक महिला अपात्र

2024 साली सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरुवातीला अनेक महिलांनी घेतला होता. मात्र कालांतराने या अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले. तसेच ज्या महिलांना ई-केवायसी पूर्ण केली नाही अशा जवळपास 80 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्याही घटली आहे. दरम्यान, या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील बोजा वाढत असल्याचे समोर आल्याने ही योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र सरकारकडून ही योजना बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल
  • ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
  • आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in