• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?

August 13, 2026 by admin Leave a Comment


कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर तयार करून मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तब्बल 5,091 कोटी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे भासवण्यात आले आणि त्याआधारे बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्या.

या प्रकरणात आरोपींनी विविध कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 3 कोटी 5 लाख रुपये उकळल्याचे**पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाऊसकीपिंगसह विविध प्रकारची कामे असल्याचे दाखवून संबंधितांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून बनावट कागदपत्रे आणि वर्क ऑर्डरच्या माध्यमातून फसवणुकीचे हे संपूर्ण रॅकेट चालवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच या फसवणूक प्रकरणामागे कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा किंवा प्रभावशाली व्यक्तीचा संबंध आढळलेला नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कुंभमेळ्याच्या नावाने एवढ्या मोठ्या रकमेची बनावट कामे दाखवून वर्क ऑर्डर काढण्यात आल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून या फसवणुकीमागील आणखी कोणाची भूमिका आहे का आणि बनावट कागदपत्रांचा वापर नेमका कुठे करण्यात आला, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..
  • समंथासोबत घटस्फोट तर, दुसरी बायको नागा चैतन्यपासून राहते दूर! थक्क करणारं कारण समोर
  • समंथासोबत घटस्फोट तर, दुसरी बायको नागा चैतन्यपासून राहते दूर! थक्क करणारं कारण समोर
  • Lalbaugcha Raja : कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला? असा काय मोठा सल्ला देतात,जो..मनसेचा ‘लालबागचा राजा’ मंडळाला रोखठोक सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in