• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KKR vs RR : अजिंक्य पहिल्या विजयानंतर आनंदी, तिघांचं नाव घेत कॅप्टन म्हणाला…

April 19, 2026 by admin Leave a Comment


एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला 19 व्या मोसमात पहिल्या विजयासाठी तब्बल सातव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागली. टीममध्ये एकसेएक फलंदाज आणि गोलंदाज असूनही केकेआरला पहिल्या 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. तर 1 सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे केकेआर रविवारी 19 एप्रिलला डबल हेडरमधील पहिल्या आणि आपल्या मोहिमेतील सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध विजय मिळवत पराभवाची मालिका खंडीत करणार का? याची प्रतिक्षा होती. केकेआरने मोसमातील पहिला विजय घरच्या मैदानात मिळवला. मात्र या विजयासाठीही केकेआरला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. केकेआरच्या या पहिल्या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अजिंक्यने या विजयानंतर केकेआरच्या तिघांना श्रेय दिलं.

केकेआरने राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 155 रन्सवर रोखलं. केकेआरसाठी वरुण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी या दोघांनी राजस्थानच्या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर केकेआरची 156 रन्सचा पाठलाग करताना 14 ओव्हरमध्ये 6 आऊट 85 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र इथून उपकर्णधार रिंकु सिंह आणि अनूकुल रॉय या जोडीने गेम फिरवला. दोघांनी उर्वरित धावा करत केकेआरला विजयी केलं. रिंकूने नाबाद 53 तर अनुकूल 29 धावांची खेळी करत केकेआरला पहिला विजय मिळवून दिला. केकेआरच्या या विजयानंतर कॅप्टन रहाणे याने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.

कॅप्टन रहाणेची प्रतिक्रिया

मी या विजयानंतर फार आनंदी आहे. मला सामन्यानंतर 5 मिनिटं अधिक वेळ मिळाला. फार चांगलं वाटतंय. सामन्यादरम्यान भावना उचंबळत होत्या. मी वैयक्तिरित्या रिंकु सिंह, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती या तिघांसाठी फार आनंदी आहे”, असं रहाणेने म्हटलं.

वरुण फार वाईट काळातून जात होता. वरुण गेल्या 3 सामन्यांत चांगली बॉलिंग करत होता. रिंकुला मानसिकरित्या कठीण काळातून जात होता. रिंकूला सामना संपवताना पाहून फार आनंद झाला”, असं अजिंक्यने म्हटलं. केकेआरला विजयासाठी 3 चेंडूत 1 धावेची गरज असताना रिंकु सिंह याने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आणि टीमला जिंकवलं.

अनूकुल रॉयसाठी रहाणेने काय म्हटलं?

अनुकूलने रिंकूसोबत सातव्या विकेटसाठी नॉट आऊट 76 रन्सची पार्टनरशीप करत केकेआरच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. अजिंक्यने अुनूकलच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीचा उल्लेख केला. ” त्याच्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमधील हंगाम फार चांगला राहिला. तो फार विश्वासू खेळाडू आहे. त्याला पाहून फार आनंद झाला”, असंही रहाणे म्हणाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी
  • GT vs MI Live Streaming : मुंबईसमोर गुजरातला सलग चौथ्या विजयापासून रोखण्याचं आव्हान, सामना किती वाजता?
  • Vastu Shastra : हातात पैसा टिकतच नाही? मग करा हे 5 सोपे उपाय
  • PBKS vs LSG : पंजाबचा झंझावात कायम, पाचवा विजय, लखनौचा 54 धावांनी धुव्वा
  • दीपिकाचे वडील होते या अभिनेत्रीच्या प्रेमात, लग्नाची खबर वाचून कोसळलं होतं रडू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in