• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agrawal Case : सिया गोयलच नाही तर, 115 महिलांवर जोडीदाराच्या हत्येचे आरोप, ‘त्या’ असं करतात तरी का? सायकोलॉजिस्टने सांगितलं डोक्यात काय सुरु असतं..

June 27, 2026 by admin Leave a Comment


Ketan Agrawal Case : उद्योजक केतन अग्रवाल याच्या मृत्यूनंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केतन याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आमच्या मुलीची काही चूक असेल तर, तिला देखील केतन जसं मारण्यात आलं, तसंच तिला देखील मारा… असं सियाच्या आई – वडिलांनी सांगितलं आहे. सुरुवातीला हे प्रकरण अपघात समजलं जात होतं. पण चौकशी सुरु करण्यात आली, तेव्हा कळलं की, हा अपघात नाही तर हत्या आहे आणि सिया हिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची हत्या… सांगायचं झालं तर, फक्त सिया हिनेच नाही तर, रिपोर्टनुसार 115 महिलांवर हत्येचे आरोप आहे… पण महिला असं का करतात? यामागे देखील मोठं कारण आहे… केतन अग्रवाल प्रकरणानंतर सायकोलॉजिस्टने महिलांच्या डोक्यात काय सुरु असतं. यावर मोठी माहिती दिली आहे.

सायकोलॉजिस्ट डॉ. बिंदा सिंग यांच्या मते, अशा प्रकरणांकडे फक्त एक अपराध किंवा गुन्हा म्हणून पाहणं योग्य नाही. अशा प्रकरणांच्या मागे काही अंतर्निहित मानसिक आणि सामाजिक घटक असू शकतात. जर एखाद्या मुलीला कुटुंबात स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसेल किंवा तिच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जात असेल. मुलगी कोणासोबत भावनात्मकरित्या जोडली गेली असेल… तिला दीर्घकाळ कोंडल्यासारखं किंवा तणावाचा अनुभव येत असेल तर, असं घडू शकतं.

डॉ. बिंदा सिंग सांगतात की, प्रेमाचं रुपांतर हळू हळू ऑब्सेशनमध्ये होतं. अशात एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की, आता आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय शिल्लकच नाही… ती व्यक्ती चांगलं आणि वाईट यामधील अंतर न समजता, घाईत निर्णय घेते. एवढंच नाही तर, सोशल मीडिया आणि आभासी दुनियेमध्ये अडकणारे लोक, वास्तवाचा स्वीकार करु शकत नाही… व्यक्ती स्वतःने तयार केलेल्या त्याच्या आयुष्यात इतका रमतो की, वास्तव आणि कल्पना यामधील अंतर त्याला कळतच नाही.

ऑस्ट्रेलिया येथील रिसर्च काय सांगतं?

अशा प्रकरणांनी जवळून समजण्यासाठी Australian Institute of Criminology (AIC) ने 2020 मध्ये महिलांद्वारे झालेल्या त्यांच्या जोडीदाराच्या हत्येवर (Intimate Partner Homicide) संशोधन करण्यात आलेलं. हे संशोधन 2004 ते 2014 या काळात ऑस्ट्रेलियात नोंदवलेल्या, 115 महिला प्रतिवादींचा समावेश असलेल्या प्रकरणांवर आधारित होते.

संशोधनात असे आढळून आले की, ज्या प्रकरणांमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होती, त्यापैकी सुमारे 48 टक्के हत्या या पूर्वियोजित होत्या; म्हणजेच, त्या अचानक आलेल्या रागाच्या भरात केल्या गेल्या नव्हत्या, तर त्यांची आधीच योजना आखण्यात आली होती. काही घटनांमध्ये पीडित व्यक्तीवर ती झोपेत असताना हल्ला करण्यात आला, तर काही प्रकरणांमध्ये संबंधित महिलेने आपल्या प्रियकराची किंवा अन्य एखाद्या व्यक्तीची मदत घेतली होती.

दरम्यान, संशोधकांना असं आढळून आलं की, अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी दीर्घकाळ कौटुंबिक हिंसाचार तसेच मानसिक किंवा शारीरिक छळ सहन केला होता. काही घटनांमध्ये स्वसंरक्षणाचा पैलूही समोर आला; त्यामुळे, सर्व प्रकरणांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही.

महिला आरोपींचे तीन प्रकारचे प्रकरण

AIC च्या रिपोर्टनुसार, महिला आरोपींचा समावेश असलेली प्रकरणं प्रामुख्याने तीन गटांत विभागली गेली

– ज्या महिलांनी दीर्घकाळापर्यंत कौटुंबिक हिंसाचार किंवा छळ सहन केला होता.

-लज्या महिलांनी नातेसंबंधातील वाद, मत्सर किंवा नातं तुटणं यांसारख्या परिस्थितींत गुन्हा केलेला.

– ज्या महिलांनी आर्थिक कारण, नवीन प्रेमसंबंध किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे आधीच ठरवून जोडीदाराची हत्या केली.

प्रत्येक प्रकरण वेगळं असतं,

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, घडलेल्या घटनांनंतर सर्व महिला आणि पुरुषांनी अरेंज मॅरिजबद्दल स्वतःच मत तयार करणं योग्य नाही. प्रत्येक गुन्ह्यामागे विशिष्ट परिस्थिती, कौटुंबिक वातावरण, मानसिक स्थिती आणि वैयक्तिक निर्णय यांचा समावेश असतो. त्यामुळे, अशा प्रकरणांचं आकलन करण्यासाठी मानसशास्त्र, गुन्हेशास्त्र आणि कायदा यांचा एकत्रितपणे विचार करणं आवश्यक आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in