• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agarwal Murder Case : कोण होता केतन अग्रवाल? ज्याला होणाऱ्या बायकोनेच 350 ते 400 फूट खोल दरीत ढकललं

June 24, 2026 by admin Leave a Comment


 

 

 

Ketan Agarwal Murder Case : पुणे येथे झालेल्या केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर प्रेम, लग्न आणि जोडीदारावर विश्वास ठेवायचा का? यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण साखरपुड्यानंतर ज्या केतन सोबत, सिया गोयल फिरत होती, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट तरत होती, तिच केतन याचा काळ बनून येईल असं कोणाला वाटलं देखील नसेल. मिळालेल्या माहितीनुसार, सिया 18 जून रोजी केतन याला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. तेथे फोटो काढण्यात व्यक्त असलेल्या केतन याला सिया हिने बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीने तब्बल 350 ते 400 फूट खोल दरीत ढकललं. यामुळे केतन याच्या कुटुंबियाचा मोठा आधार हरपला आहे… जाणून ध्या कोण होता केतन अग्रवाल आणि काय काम करायचा?

केतन याच्याबद्दल समोर येत असलेल्या माहितीनूसार, केतन ‘सक्सेस ग्रुप’ या कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायाचा संचालक तसेच ‘चीफ मार्केटिंग ऑफिसर’ (CMO) होता. केतन पुणे येथे कार्यरत होता. केतन याने ‘बॅब्सन एफ.डब्ल्यू. ओलिन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस’मधून उद्योजकतेमध्ये (Entrepreneurship) ‘मास्टर ऑफ सायन्स’ची पदवी प्राप्त केली होती.
त्याच्याकडे ‘सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी’ची BBA पदवी देखील होती.

केतन अग्रवाल याच्या LinkedIn प्रोफाईलनुसार, ते शाश्वतता आणि नाविन्यपूर्णतेसाठी कटिबद्ध होता; त्याचप्रमाणे ते अशा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत होता, जे केवळ आर्थिक विकासाला चालना देत नाहीत तर हरित भविष्यासाठीही योगदान देतात. अशात कुटुंबाने उभ्या केलेल्या व्यवसायाला पुढे घेऊन जाणं, हेच केतन याचं स्वप्न होतं… पण नियतीच्या मनात असं काही भयानक लिहिलं असेल असं कोणाला वाटलं देखील…

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी FIR दाखल

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. यामध्ये केतन याचे वडील देवीचंद अग्रवाल यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत अनेक हैराण करणारे दावे केले आहेत. दाखल तक्रारीनुसार, सिया आणि केतन कायम एकमेकांना भेटायचे आणि फिरायला जायचे. पण काही दिवसांनंतर सिया हिच्या वागणुकीत बदल झाल्याचं केतन याने कुटुंबियांना सांगितलं होतं.

केतन याच्या बहिणीला आलेला संशय

प्रकरणाची माहिती देत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुख्य संशयित सिया गोयल हिने केतनच्या अंत्यसंस्कारांनंतर चार दिवसांनी त्याच्या घरी भेट दिली होती. या भेटीदरम्यान, केतन याच्या बहिणीने तिला (सिया) काही प्रश्न विचारले आणि तिची उत्तरे संशयास्पद वाटली; या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुपचूपपणे तपास सुरू केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in