• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agarwal Murder Case : केतनच्या हत्येनंतर सिया आणि चेतनचा ठरला मोठा प्लान , पोलिसांचा दट्ट्या पडताच धक्कादायक गोष्ट समोर; पुढचे…

June 27, 2026 by admin Leave a Comment


केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत. कोणताही अँगल सुटू नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सिया आणि चेतनला घटनास्थळी नेऊन घटना कशी घडली याची माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल जप्त केले असून अधिक तपास करत आहेत. या मोबाईल चॅटमधून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. केतनची हत्या केल्यानंतर सिया आणि चेतनने एक मोठा प्लान केला होता, अशी माहिती समोर आली होती. या प्लाननुसार दोघेही एकमेकांना काही दिवस भेटणार नव्हते, असं आता समोर आलं आहे.

पोलिलासांनी सिया आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली. त्यातून काही माहिती समोर आली आहे. केतन अग्रवालची हत्या केल्यानंतर कुठलाही संशय वाढू नये म्हणून या दोघांनी एक प्लान केला होता. या प्लाननुसार, हत्येनंतर काही दिवस न भेटण्याचा सिया आणि चेतन चौधरी यांनी निर्णय घेतला होता. कोणताही संशय येऊ नये, हा त्यांचा हेतू होता, अशी माहिती समोर आली आहे.

चॅटही डीलिट

केतनचा खून करण्यापूर्वी आणि नंतर या दोघांनीही मोबाईलमधील सर्व चॅट डीलिट केली होती. चुकूनही दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते हे कुणाला कळू नये म्हणून त्यांनी हा प्लान केला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी सर्व प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांनी या दोघांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. दोघांच्याही मोबाईलमधील डीलिटेड चॅट्स रिकव्हर करण्यात येणार आहे. त्यातून पोलिसांच्या हाती नेमकी माहिती येणार असून ही माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वकिलांचा दावा काय?

दरम्यान, सियाचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही स्वतंत्र साक्षीदार समोर आलेला नाही. सियाने गुन्हा केल्याचं कुणीही सांगितलं नाही. या घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, असं वकील श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सियाचा भाऊ साहिल गोयलची पोलिसांनी काल 10 तास चौकशी केली. सिया, केतन आणि चेतन या तिघांशी संबंधित प्रश्न पोलिसांनी साहिलला विचारलं. साहिलचं अफेयर होतं का? असा सवालही पोलिसांनी त्याला विचारला असल्याचं सांगितलं जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Uddhav Thackeray: मुलीची सोयरीक जुळवता जुळवता… उद्धव ठाकरे यांचा संजय देशमुखांवर यॉर्कर, म्हणाले गाढवाचं…
  • 4 मिनिटे 40 सेकंदाचं गाणं, संगीतकाराने पाकिस्तानचं चोरलं! मिळवला फिल्मफेअर, आजही ट्रेंडमध्ये
  • Tejas Fighter Jet : आधीच एअर फोर्सला तेजस विमानं उशिराने मिळतायत, त्यात आता अमेरिकन कंपनी GE मुळे बसला पुन्हा झटका
  • India vs Ireland : वैभव सूर्यवंशीला बसवून ठेवलं, गंभीरवर टीकेची झोड; दुसऱ्या T20 मध्ये तरी मिळणार का संधी ?
  • इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in