• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agarwal Murder : केतनला मारल्याची खंत नाहीच, सियाची लॉकअपमध्ये भलतीच मागणी, ऐकूनच डोक्यात जाईल तिडीक

June 26, 2026 by admin Leave a Comment


लोहगडावर गेल्यावर होणाऱ्या पतीला शेकडो फूट खोल दरीत ढकलून देणारी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा देश हादरला आहे. सध्या जिथे बघावं तिथे या दोघांची चर्चाआहे, अवघ्या 20-25 वर्षांच्या वयात असलेल्या या दोघांनाएवढ क्रूर कृत्य करण्याची हिंमत तरी कशी झाली ? एखाद्या जिवंत व्यक्तीला मारताना, त्याचा जीव घेताना, खोल कड्यावरून ढकलताना याना काहीच वाटलं नसेल का ? असा सवाल लोकांच्या मनात आहे, केतनची (Ketan Agarwal Murder ) बातमी ऐकून अनेक जण हळहळले, काही लोकं तर हादरलेच. पण ज्यांनी हा क्रूर गुन्हा केला, केतनला मारलं, ती सिया आणि चेतन यांना मात्र आपल्या कृत्याचा जराही पश्चाताप नाही. त्या दोघांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून पोलिस कस्टडीतील सियाचं वागणं आणि तिचे कारनामे ऐकून तर कोणालाही संताप येईल.

आपल्यावर एका व्यक्तीच्या खुनाचा आरोप आहे, त्यासाठी लॉकअपमध्ये आहोत आपण , याबद्दल पश्चाताप, खेद वा खंत याचा जराही लवलेश सियाच्या चेहऱ्यावर नाही. आणि त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे लॉकअपमध्ये असतानाही, पोलिसांसमोरच तिने अशी गोष्ट मागितली की सगळेच हैराण झाले. केतनच्या खुनातिलच्या आरोपाखाली, गजाआड असलेल्या सियाने पोलिसांकडे चक्क ‘बीअर’, दारू मागितल्याची माहिती समोर आली आहे.

घरचं जेवण आणि मागितली दारू

29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेल्या सिया आणि चेतनची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्या दोघांना वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र एका जिवंत माणसाचा खून केल्यावरही हे दोघं अतिशय नॉर्मलपणे वागताना दिसले. सियाच्या चेहऱ्यावर तर श्रीमंतीचा माज स्पष्टपणे दिसतो. आपल्याला काही होणार नाही, असा विश्वास तिच्या वागण्यात असून हे सगळं ती अजूनही हलक्यात घेत आहे, तिच्या चेहऱ्यावर जराही चिंता , काळजी दिसली नाही.

सर्वात हादरवणारी गोष्ट म्हणजे सियाने पोलिसांकडे केलेली मागणी. तिला दारू प्यायची प्रचंड सवय असून खुनाच्या आरोपाखील लॉकअपमध्ये असतानाही सियाने पोलिसांकडे थेट बिअरच मागितली, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यावेळी जे पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते, तेही सियाची मागणी ऐकून थक्क झाले. मात्र त्यांनी सियाला कडक शब्दांत खडसावलं, त्यानंतर सिया ही शांत झाली.

चेतन – सियाचा कांगावा, एकमेकांवर टाकला हत्येचा दोष

दरम्यान ज्या प्रेमापायी सिया आणि चेतन यांनी केतनला मार्गातून हटवलं, गुन्हा उघडकीस आल्यावर त्याचं हे प्रेम गायबच झालं. पोलिसांनी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. मात्र ते दोघेही एकमेकांवर आरोप करत गुन्ह्याचा दोष समोरच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुन्ह्यात आपला सहभाग कमी असल्याचा दाखवायचा दोघांचाही प्रयत्न सुरू आहे.

मला सियासोबत पळून जायचं होतं, पण कुटुंबाची बदनामी होील या भीतीने ती पळून जायला तयार नव्हती, तिने नकार दिला आणि केतनची हत्या करूया असा आग्रह तिनेच केला असा दावा चेतन याने केला. तर सियाने आपल्यावरील आरोप झटकून टाकले. केतन याला मारण्याची आयडिया, प्लान चेतन याचाच होता, असा आरोप सिया हिने केला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in