• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?

June 23, 2026 by admin Leave a Comment


कुटुंबीय, होणारी पत्नी आणि मित्रांसह लोहगजावर फिरायला गेलेल्या केतन अग्रवाल हा तरूण पाय घसरून शेकडो फूट दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ माजली. केतनच्या भावी पत्नीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या कुटुंबियांवर तर शोककळा पसरली. मात्र याच केसला आता एक धक्कादायक वळण मिळालं आहे. कारण केतनाच मृत्यू हा अपगाती नसून त्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्याची मारेकरी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची अतिशय जवळची व्यक्तीच होती. हो, त्याच्या होणाऱ्य पत्नीनेच मित्रासह मिळून केतनची हत्या केल्याचे अतिशय धक्कादायक सत्य उघडकीस आलं आहे. यामुळे तर अक्षरश: खळबळ माजली असून पोलिसांनी या प्रकरणी सिया गोयल आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे,

केतन हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं सिया गोयल हिच्याशी लग्न ठरलं होतं. त्यासाठी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने तयारी सुरू होती. लग्नाचा थाटच वेगळा होता. विविहासाठी जयपूरमधला खासपॅले बूक करण्यात आला होता, येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास दोन खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र लग्नापूर्वी काही महिने आधीच केतनचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

नेमकं काय झालं ?

गेल्या आठवड्यात , 19 जून रोजी केतनच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस होता., त्यानिमित्ताने सर्व कुटुंबीय, मित्र असे दोन तीन दिवस फिरायला बाहेर पडले होते. सियाच्या वाढदिवसासाठी केतनने खूप तयारी केली होती. . महाबळेश्वरमध्ये तिचा वाढदिवस मस्तपैकी सेलिब्रेट करण्याचा त्याचा प्लान होता. त्याच्या आदल्या दिवशीच तो कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. मात्र तिथेच त्याचा घात झाला आणि जीव गेला.

पोलिसांनी कसं उकललं गूढ ?

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ आणि ‘मावळ वन्यजीव संरक्षण संस्था’ यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. खडतर भूभागात राबवलेल्या आव्हानात्मक बचावकार्यानंतर केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना अनेक त्रुटी आढळल्याने त्यांचा संशय वाढला आणि तपासाची तक्र वेगाने फिरू लागली. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला. केतन नेमका कसा पडला हे शोधणं सुरू झालं. त्या दरम्यान पोलिसांनी लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा एका तरूणाच्या हालचालींचा त्यांना संशय आला. गेल्या आठवड्यात प्रचंड उकाडा होता, ऊन होतं, तरीही तो तरूण बर उन्हात मोठ हुडी घालून वावरत होता. कानात घातलेले हेडफोन आणि हुडीने चेहरा झाकण्याचा त्याचा प्रयत्न पोलिसांना दिसल्याने त्यांचा संशय बळावला. त्ायंनी आणखी खोलात जाऊन तपास केल्यावर त्याच तरूणाने केतनाल ढकलल्याचं समोर आलं आणि हत्येचं हे गूढ उकललं.

सियानेच काढला केतनचा काटा

पाय घसरून तदरीत कोसळल्याने केतनचा जीव गेला असं सर्वांनाच वाटत होतं, या अपघाती मृत्यूमुळे सगळचे हळहळले. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यावर वेगळचं सत्य समोर आल्याने सगळेच हादरले. केतनचा पाय घसरला नलव्हता तर त्याची होणारी पत्नी सिया हिने तिच्या मित्रासह मिळून त्याचा काटा काढला. लोहगडावर फिरत असताना आजूबाजूला कोणी नाही हे पाहून, संधी साधून सियाने तिच्या मित्राच्या मदतीने केतनला दरीत ढकलून दिलं. 400 फूट खोल दीरत कोसळल्याने केतन गंभाीर जखमी झाला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
  • अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली
  • India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in