• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Karuna Munde: फक्त 2 ते 3 महिने… धनंजय मुंडेंवर मोठं राजकीय संकट? करुणा मुंडेंच्या त्या दाव्याने मोठी खळबळ

April 26, 2026 by admin Leave a Comment


Karuna Munde on Dhananjay Munde: करुणा मुंडे यांनी विविध विषयावर मतं मांडली. मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात त्यांनी मत मांडलं. तर त्याचवेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाबद्दल खळबळजनक दावा केला. त्यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बागेश्वरबाबा स्वयंघोषीत बाबा आहे. बागेश्वर बाबाची शिवरायांबाबत बोलायची लायकी नाही. तर आठ महिन्यांआधी धीरेंद्र शास्त्रीवर महिला तस्करीचा आरोप असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. बागेश्वर, आसाराम, खरात हे सगळे बीजेपी घोषीत बाबा असल्याचा आरोप त्यांनी केला. बाबा लोकं नेत्यांसाठी महिला तस्करी करतात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

धीरेंद्र शास्त्री यांना थेट आव्हान

स्वयंघोषित जे बाबा लोक आहेत, या सगळ्या लोकांना राजकीय आश्रय भेटते. त्यांच्यामुळे हे लोक एवढे मोठे होतात. छत्रपती शिवाजी महाराज बद्दल तुम्ही काय बोलणार, तुमच्यासारखे बाबा लोक लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवतात.छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याची तुमची लायकी सुद्धा नाहीये. किती बाबा लोक जेलमध्ये गेले, पण परत तयार होतात. हे बाबा लोक नेता लोकांना महिला तस्करी करतात. धीरेंद्र शास्त्रीला चॅलेंज करते मी पण ब्राह्मण जातीची आहे. तुमची लायकी काय आहे मी दाखवून देईल. तुम्ही वन टू वन माझ्यासोबत डिबेट मध्ये या, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

मुंडेंची आमदारकी जाणार

धनंजय मुंडें यांची आमदारकी पुढील २ ते ३ महिन्यात जाणार असा मोठा दावा करुणा मुंडे यांनी केला. यापूर्वी धनंजय मुंडे हे दुसरे खरात असल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले, चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

मराठी भाषा कठीण

मनसे आणि भाजप लोकांची दिशाभूल करतायत. मुंबईत अनेक रिक्षा चालक परप्रांतीय आहे. मराठी माणसं या व्यवसायात कमी आहेत. मी 27 वर्ष धनंजय मुंडे सोबत राहून मला मराठी नीट येत नव्हती. 2 वर्षापूर्वी राजकारणात आल्यावर मराठी शिकली. मराठी भाषा कठीण आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. रिक्षाचालकांना मराठी सक्ती करू नका अशी विनंती करणार आहे. परप्रांतीय लोक सोडून गेले तर आर्धी मुंबई खाली होईल, मंत्र्यांच्या बंगल्यातपण अनेक युपी, बिहारवाले काम करत आहेत. जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आंदोलन करणार. बिहार आणि यूपी चे लोक जरी परत गेले ना मुंबई सोडून तर आधी मुंबई खाली होणार आणि स्वत:च्या घराचे काम स्वत:ला करावे लागणार. देवा भाऊंच्या बायकोला पण काम करावे लागणार असे करुणा मुंडे म्हणाल्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना वीज, ना इंटरनेट… भारतातील हे वैदिक गाव 300 वर्षे मागे, 56 लोकांच्या गावातील जीवनशैली वाचून थक्क व्हाल
  • IPL 2026: 36 सामन्यात 129 षटकार..! सीमेपार चेंडू पोहोचवण्यात हे खेळाडू आघाडीवर, जाणून घ्या
  • Share Market: महत्त्वाची अपडेट, येत्या शुक्रवारी शेअर बाजारात नाही होणार ट्रेडिंग, कारण काय?
  • कन्सट्रक्शन बघता-बघता सुचलं गाणं, जे ठरलं ब्लॉकबस्टर, एक रात्रीत हिरो-हिरोईन झाले स्टार, आजही प्रत्येकाचं फेव्हरेट
  • जग युद्धात व्यस्त असताना भारताने टाकला डाव, या बड्या देशासोबत FTA कराराची घोषणा, कुणाला फायदा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in