
आयपीएल 2026 स्पर्धा अर्थात 19व्या पर्वात फलंदाजांनी अक्षरश: कहर केला आहे. गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडत आहे. दिग्गज गोलंदाजांना कुठे टप्पा टाकावा यासाठी विचार करावा लागत आहे. आयपीएल स्पर्धेत 36 सामन्यांचा खेळ संपला असून षटकारांच्या बाबतीत 5 खेळाडू टॉपवर आहेत. (Photo- IPL/BCCI)
आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात चर्चेत असलेला खेळाडू म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी.. त्याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्ससारख्या दिग्गज गोलंदाजांना सोडलं नाही. वैभव सूर्यवंशीने 8 सामन्यात 32 षटकार मारत पहिलं स्थान पटकावलं आहे. (Photo- IPL/BCCI)
सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 8 डावात 28 षटकार मारले आहेत. त्यामुळे गोलंदाजांना त्याची धास्ती लागून आहे. सुरूवातीला फॉर्ममुळे त्रस्त होता. मात्र सूर गवसताच गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला आहे. (Photo- IPL/BCCI)
तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्या आहे. त्याने 6 सामन्यात 25 षटकार मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याला आणखी संधी मिळाली तर नक्कीच अव्वल स्थान गाठू शकतो. (Photo- IPL/BCCI)
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मधल्या फळीत फलंदाजीला आला की फिरकीपटूंवर तुटून पडतो. त्याने आतापर्यंत 23 षटकार मारले आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात षटकारांची शर्यत आणखी तीव्र होत जाणार हे नक्की आहे. (Photo- IPL/BCCI)
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने सात डावात 21 षटकार मारले आहेत. अय्यरच्या फॉर्ममुळे पंजाब संघाला प्रचंड बळ मिळत आहे. तसेच टॉप 5 मध्ये त्याने जागा मिळवली आहे. (Photo- IPL/BCCI)





Leave a Reply