• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार

July 20, 2026 by admin Leave a Comment


कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारे थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रियकराचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह गोणीत बांधून बाथरूममध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेने खून केल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये म्हणून बाथरूममधील पाण्याचा नळ तब्बल 24 तास सुरू ठेवला. मात्र, फ्लॅटमधून पाणी बाहेर वाहू लागल्याने संशय निर्माण झाला आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर आरोपी महिलेने घरमालकाला व्हॉईस मेसेज पाठवत खुनाची कबुली दिली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विनंतीही केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

घटना घडल्यानंतर आरोपी महिला कोलकात्याकडे फरार झाली असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके रवाना केली आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या धक्कादायक हत्याकांडामुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून हत्येमागील नेमके कारण आणि इतर सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून…
  • भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
  • त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट…
  • नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?
  • यूपीच्या निवडणुकीमुळे मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर, अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in