• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय

July 25, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत तिसऱ्या फेरीची बैठक पार पडली असून, या बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

जेपी नड्डा म्हणाले की, आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सरकारसमोर मांडल्या. त्यामध्ये आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच, दिल्ली आणि भाजपशासित राज्यांमध्ये आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारने ही मागणी मान्य केली असून, भविष्यातही या आंदोलनाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीवरही सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचं नड्डा यांनी सांगितलं. अशा कुटुंबांबद्दल सरकारला पूर्ण सहानुभूती असून, नियमानुसार शक्य तितकी जास्त नुकसानभरपाई देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या फाईव्ह पॉइंट चार्टरवरही सरकार गंभीरपणे विचार करणार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. विशेषतः परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचनांचा अभ्यास केला जाईल. आंदोलनकर्त्यांशी पुढील चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारा योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in