• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा

June 25, 2026 by admin Leave a Comment


शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय संघर्षात खासदार संजय दिना पाटील यांच्या माध्यमांसमोरील वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे आणि काही वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे समोर आल्यानंतर आव्हाड यांनी त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांच्या आरोपांवर उत्तर देताना संजय दिना पाटील हे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि काही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला संजय पाटील यांचा स्वभाव चांगला माहिती आहे. ते माझे मित्र आहेत. मात्र त्यांनी जे वक्तव्य केले, ते चुकीचे होते, हेही मी स्पष्टपणे सांगतो. तरीही संजय पाटील हे गुंड प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व नाहीत.”

पुढे बोलताना आव्हाड यांनी, “कदाचित ते भावनेच्या भरात बोलले असतील. पण बॉम्ब टाकेन, मारून टाकेन अशा प्रकारची भाषा वापरण्याचा काळ आता राहिलेला नाही,” असे मत व्यक्त केले.

तसेच त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने सल्ला देताना सांगितले की, “अशी वक्तव्ये राजकीय कारकीर्दीवर परिणाम करू शकतात. हीच वाक्ये एखाद्या नेत्याचे राजकारण संपवू शकतात, एवढेच मला सांगायचे आहे.”

दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादात आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा इशारा; 58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
  • Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन का साजरे केले जाते? जाणून घ्या सनातन धर्मातील रक्षासूत्राचे महत्त्व आणि पौराणिक कथा
  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच
  • अचानक रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान, संपूर्ण युरोपमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in