• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ISRO च्या खाजगीकरणाच्या चर्चेमुळे कर्मचारी चिंतेत, चीफकडून मागितलं स्पष्टीकरण

September 6, 2026 by admin Leave a Comment


ISRO : ISRO च्या खाजगीकरणाच्या चर्चेमुळे कर्मचारी चिंतेत आहेत. यावर त्यांनी प्रमुखांकडून स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे कर्मचारी आता अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याबाबत चिंतेत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, इस्रोच्या हजारो कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 9 संघटनांनी एजेन्सीच्या उत्पादन आणि ऑपरेशनल कामाचं खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावाबाबत अधिकृत स्पष्टीकरण मागितले आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांना लिहिलेल्या पत्रात, कर्मचारी संघटनांनी संस्थेच्या खाजगीकरणाची दिशा आणि उपस्थित कर्मचाऱ्यांचं आणि संस्थेच्या भविष्यातील भूमिकेवर होणारा परिणाम यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अनेक महिन्यांनंतर इस्रोच्या GSLV रॉकेटद्वारे पृथ्वी-निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, इस्रोच्या विविध केंद्रांमधील कर्मचारी संघटनांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

या पत्रावर जिन यूनियन यांची देखील स्वाक्षरी आहे. ज्यामध्ये ISRO स्टाफ असोसिएशन, SHAR एम्प्लॉईज एसोसिएशन, ISAC एम्प्लॉईज एसोसिएशन, ISRO स्टाफ एसोसिएशन-LPSC, ISRO स्टाफ एसोसिएशन-BBU, NRSA एम्प्लॉईज यूनियन, स्पेस एम्प्लॉईज एसोसिएशन-BBU, ISRO स्टाफ एसोसिएशन-IPRC आणि SAC एम्प्लॉईज वेलफेयर एसोसिएशन देखील सामिल आहे.

पवनकुमार गोयंका यांचं वक्तव्य

इंडियन नेशनल स्पेस प्रमोशन एन्ड ऑथराइजेशन सेंटर (IN-SPACe) चे अध्यक्ष पवनकुमार गोयंका यांनी नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं आहे की, आता ISRO कोणत्याच प्रकारचं लॉन्च व्हीकल तयार करणार नाही आणि त्याची निर्मिती देखील करणार नाही. हे सर्व काम आता खासगी क्षेत्र किंवा PSU कारणार… स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हीकल याच्यासोबत बदलाची प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. आणि हे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हीकल (PSLV) आणि LVM3 पर्यंत देखील वाढू शकतं…’

लॉन्च व्हीकल उत्पादनाचं इतर ठिकाणी स्थलांतर, इस्रोकडून उपग्रह निर्मितीची नियमित कामं काढून घेणं आणि खाजगी कंपन्यांसाठी नवीन प्रक्षेपण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं यांबाबतच्या वृत्तांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. इस्रोकडून खाजगी क्षेत्राकडे आधीच हस्तांतरित करण्यात आलेल्या सुमारे 120 तंत्रज्ञानांचा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रात कोणत्या गोष्टींवर चिंता करण्यात आली व्यक्त…

पत्रात असं लिहिलं आहे की, ‘या सर्व विधानांनी राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतलं आहे. पण, अंतराळ विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेलं धोरण, कायदेशीर व प्रशासकीय आधार, त्याच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध मनुष्यबळ किंवा भविष्यातील सरकारी भरतीवर होणारा त्याचा परिणाम यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.’ एवढंच नाही तर, ‘लॉन्च व्हीकलची डिझाईन, त्याला तयार करणं, इंटिग्रेशन, चाचणी आणि लॉन्च ऑपरेशन फक्त मॅन्युफॅक्चरिंग करार नसून संस्थेची मुख्य कौशल्ये, संस्थात्मक ज्ञान आणि धोरणात्मक क्षमतांचे प्रतिनिधित्व करतात.’ असं देखील पत्रात लिहिण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! आंदोलनाचा लढा पेटणार, आता थेट मनोज जरांगे पाटील यांच्या अतंरवालीतच ओबीसी नेत्याचं उपोषण, तगडा पोलीस बंदोबस्त
  • Shadashtak Yog 2026: सूर्य-शनीचा षडाष्टक योग या ५ राशींसाठी अशुभ! तुमची रास तर नाही ना? चेक करा
  • दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना; पाच मजली इमारत कोसळली, बचाव कार्याला सुरुवात
  • Video : अंशुमन विचारेच्या स्वप्नातलं घर अखेर साकार, इंटिरियअरने वेधलं सर्वांचं लक्ष
  • Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का! एका झटक्यात 4,000 लोक बेरोजगार होणार, मोठं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in