
मोठी बातमी समोर येत आहे, दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एक पाच मजली इमारत कोसळली असून, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. बचाव कार्याला तातडीने सुरुवात झाली आहे. दक्षिण दिल्लीतील प्रसिद्ध सत्य निकेतन परिसरात ही घटना घडली आहे. रविवारी पाच मजली जुनी इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटना लक्षात येताच स्थानिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. स्थानिकांकडू बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र नेमके किती लोक या इमरातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीमध्ये एक जुनी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीमधील सत्य निकेतन परिसरात ही पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीमध्ये ही घटना घडली आहे. ही इमारत अचानक कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला, स्थानिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली, अन् बचाव कार्याला देखील सुरुवात केली आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, अग्निशमन दलाच्या गाड्यासोबतच एनडीआरएफचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं आहे, बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी देखील घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र नेमके किती लोक अडकले आहेत? याचा आकडा अद्याप समोर आलेला नाहीये, बचाव कार्य सुरू आहे.
Leave a Reply