• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

iron dom : भारताची ताकद वाढतेय, इस्रायलच्या आयर्न डोमला आता मेक इन इंडियाचा आधार

July 10, 2026 by admin Leave a Comment


राफेल एडवांस्ड डिफेंस सिस्टिम्स ही संरक्षण क्षेत्रातली मोठी इस्रायली कंपनी आहे. ही कंपनी आता आयर्न डोमसाठी लागणारे इंटरसेप्टर मिसाइल्सचं उत्पादन भारतात सुरु करण्याच्या तयारीत आहे. राफेल कंपनीची या संदर्भात भारतीय संरक्षण कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. हा करार प्रत्यक्षात आला तर पहिल्यांदाचं आयर्न डोम इंटरसेप्टर मिसाइलचं उत्पादन इस्रायल आणि अमेरिकेबाहेर भारतात होईल. आयर्न डोम ही इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम आहे. इराण विरूद्धच्या युद्धात या एअर डिफेन्स सिस्टिमने भक्कम सुरक्षा कवचाचं काम केलं. राफेल कंपनीचं हे पाऊल भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि ‘आत्मनिर्भर भारता’चं जे धोरण आहे, त्याला बिलकुल अनुरुप आहे. भारत बऱ्याच काळापासून परदेशी संरक्षण कंपन्यांना भारतात कारखाने सुरु करण्यासाठी बोलवत आहे. यामुळे फक्त देशाची संरक्षण उत्पादन क्षमता वाढणार नाही, तर जागतिक पुरवठा साखळीत भारताची एक मजबूत भूमिका असेल.

सध्या आयर्न डोम इंटरसेप्टर मिसाइल्सचं उत्पादन उत्तर इस्रायलमध्ये होतं. त्या शिवाय अमेरिकेत रेथियॉन सोबत भागीदारी करुन दुसरी उत्पादन लाइनही सुरु आहे. भारतात नवीन उत्पादन कारखाना सुरु झाल्याने उत्पादन खर्च कमी होईल. पुरवठा साखळी अजून मजबूत होईल. गरज पडल्यास जागतिक मागणी लवकर पूर्ण करता येईल. भारत आणि इस्रायलमध्ये संरक्षण क्षेत्रात आधीपासून मजबूत भागीदारी आहे. दोन्ही देशांनी मिळून बराक-8 (Barak-8) लॉन्ग रेंज सरफेस टू एअर मिसाइल सिस्टिम विकसित केली आहे. या मिसाइलचा भारतीय एअर पोर्स, नौदल आणि सैन्याकडून वापर होतो. त्याशिवाय भारताने कमी पल्ल्याची हवाई सुरक्षेसाठी डिफेन्स सिस्टिम विकसित केली आहे.

रणनितीक दृष्टया फायद्याचा सौदा

पश्चिम आशियातील संघर्षानंतर जगभरात एअर डिफेन्स सिस्टिमची मागणी वेगाने वाढली आहे. भारतात आयर्न डोम इंटरसेप्टर निर्मितीचा राफेलसाठी रणनितीक दृष्टया फायद्याचा सौदा आहे. कंपनीला भारतातून दुसऱ्या देशांना निर्यात करता येईल. भारतातही आयर्न डोम सारख्याच स्वदेशी मिशन ‘सुदर्शन चक्र’ एअर डिफेन्स सिस्टिमवर वेगाने काम सुरु आहे. राफेल सोबत व्यावसायिक भागीदारमुळे भारतीय संरक्षण उद्योगाला नवीन टेक्नोलॉजी, उत्पादन क्षमता आणि निर्यातीची संधी मिळेल. हा करार झाल्यास भारत फक्त इस्रायलचा ग्राहक राहणार नाही.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in