• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला दुसऱ्या सामन्यातही संधी नाहीच, दोघांचं पदार्पण

June 28, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लब इथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाज पहिल्या सामन्यात आयर्लंडला कमी धावसंख्येत रोखण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे आता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाज आपली चूक सुधारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियासाठी करो या मरो सामना

यजमान आयर्लंड 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला मालिका बरोबरीत राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. टीम इंडियाकडून सलग दुसऱ्या सामन्यातही युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला संधी दिली नाही. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे वैभवला आता आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

भारताकडून दोघांचं पदार्पण

टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. आयर्लंड विरूद्धच्या अंतिम सामन्यातून टीम इंडियाकडून दोघांचं पदार्पण झालं आहे. प्रिन्स यादव आणि मुंबईकर सूर्यांश शेडगे या दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे डेब्युटंट खेळाडू आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : टीम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलर्ड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी
  • नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in