• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?

August 25, 2026 by admin Leave a Comment


अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टीमध्ये संघटनात्मक बदल केला आहे. या विस्तारात अनेक पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ दास आणि आशुतोष रांका हे पक्षाचे सहसंयोजक होते. आता त्यांच्या जागी दोन नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीजेपीने सहा नवीन संघटन महासचिवांचीही घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या पदावर रेखा शर्मा, अक्षय शिंदे, प्रेम आकाश, अनाम उज्जमा आणि बालाकृष्ण शुक्ला यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अभिजीत दीपके यांनी गेल्या दोन आठवड्यात घेतलेला हा मोठा निर्णय आहे.

सीजेपीने संघटनेत मोठा उलटफेर करताना सुधीर सांगवान आणि सिद्धांत भारद्वाज यांना राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्त केलं आहे. यापूर्वी ही जबाबदारी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यावर होती. आता रांका आणि दास यांना राष्ट्रीय सह-संयोजक बनवण्यात आलं आहे. त्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त होती, ती अखेर भरण्यात आली आहेत. सीजेपीने संघटनेच्या स्थापने नंतर सर्वात आधी तीन प्रवक्त्यांची नियुक्ती केली होती. तिसरे प्रवक्ता विजेता दहिया यांना 20 जुलै रोजी बर्गर प्रकरणानंतर संघटनेतून बाहेर करण्यात आलं होतं.

नॉर्थ झोनसाठी विस्तार

कॉकरोच जनता पार्टीने नॉर्थ झोनसाठी को-ऑर्डिनेशन कमिटीच्या अनेक सदस्यांना ठेवलं आहे. या समितीत आदेश प्रधान गुर्जर, अजाद मोहित, मोहम्मद फरहान खान, विश्वेष कर्नवाल, उज्ज्वल पांडे, पूजा सैनी, आफताब सिंह विर्क, अर्थदीप सिंह कोचर, जाहिद अहमद माले, महविश अली, श्रेष्ठ सिंह खेरा, अजय देशवाल, डॉ. विवेक सांगवान, मुकेश ऑलराऊंडर, राम जाखड, हर्ष कार्तिकेय सिंह आणि अॅड. आरुषी घई यांचा समावेश करण्यात आली आहे. ही सर्व टीम नॉर्थ झोनवर फोकस करणार आहे.

सीजेपीचा पुढचा प्लान काय?

सीजेपीने येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत 36 दिवस आंदोलन चाललं. त्यानंतर सरकारने आश्वासनं दिल्यावर 25 जुलै रोजी आंदोलन मागे घेतलं. पण त्यानंतर अजून पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने इंडिया गेटवर मार्च काढण्यात येणार आहे. इंडिया गेटवरून हा मार्च सुरू होणार असून दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाणार आहे, अशी माहिती सीजेपीने दिली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in