• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

August 25, 2026 by admin Leave a Comment


आजच्या या स्पर्धेच्या युगाच टिकून राहयचं असेल तर, कामाला अधिक महत्त्व देण्याची गरज भासतेच. पण काम तर महत्त्वाचं आहेच. पण त्यासाठी आरोग्य सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. पुरुषांच्या तुलनेत कामाच्या व्यापामुळे महिला स्वतःकडे लक्ष देणं पूर्णपणे विसरून जातात. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत काही लक्षणं आहेत, ज्याकडे कधीच दुर्लक्ष करु नका. सांगायचं झालं तर, अनेक लोक सततचा थकवा, हात-पायांना मुंग्या येणे, जिभेतील बदल, काहीही नीट लक्षात न राहणे किंवा चालताना तोल जाणे यांसारख्या लक्षणांकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. परंतु यापैकी काही लक्षणे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची धोक्याची चिन्हे असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका.

भूलतज्ज्ञ आणि इंटरव्हेन्शनल पेन मेडिसिन डॉक्टर, डॉ. कुणाल सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात दिसू शकणारी काही महत्त्वाची लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बी12 च्या कमतरतेमुळे ॲट्रॉफिक ग्लोसायटिस होऊ शकतो. या स्थितीत, जीभ नेहमीपेक्षा अधिक गुळगुळीत, चमकदार किंवा लालसर दिसू शकते. काही लोकांना जिभेमध्ये वेदना किंवा जळजळ देखील जाणवू शकते. त्यामुळे बिलकूल दुर्लक्ष करु नका

बी12 च्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये अडथळा येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, यामुळे मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होऊ शकतो. जेव्हा शरीराच्या ऊतींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, तेव्हा थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, धाप लागणे किंवा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी बी12 खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंना इजा होऊ शकते, ज्यामुळे हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे, जळजळ होणे, बधिरता येणे किंवा संवेदना नाहीशी होणं अशी लक्षणे दिसू शकतात. काही लोकांमध्ये, ही लक्षणे प्रथम पायांमध्ये दिसू शकतात आणि नंतर शरीराच्या वरच्या भागापर्यंत पसरू शकतात.

जर बी12ची कमतरता दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्याचा परिणाम पाठीच्या कण्यातील काही विशिष्ट चेतामार्गांवर होऊ शकतो, जे तुम्हाला तुमच्या शरीराची स्थिती जाणण्यास मदत करतात. यामुळे चालताना अडखळणे, वारंवार ठेच लागणे, अंधारात चालण्यास अडचण येणे किंवा पाय रुंद पसरून काळजीपूर्वक चालावे लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच उपचार सुरु करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
  • हॉटेलमध्ये भेटू, तू चांगली दिसतेस; ग्राम महसूल अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in