• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IRE vs IND : संजू सॅमसनला मोठी संधी, रोहित शर्माला पछाडणार?

June 24, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत एकूण 2 सामने खेळणार आहे. या मालिकेला 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याला या मालिकेत माजी फलंदाज रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. आयर्लंड-भारत टी 20I मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर आहे. आता संजूच्या निशाण्यावर रोहितचा विक्रम आहे. त्यामुळे आता संजू रोहितला मागे टाकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संजूला किती धावांची गरज?

रोहित शर्मा भारत-आयर्लंड टी 20I मालिकेत 200 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहित आयर्लंड विरुद्ध 4 टी 20I सामने खेळला आहे. रोहितने या 4 सामन्यांत आयर्लंड विरुद्ध 201 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 3 अर्धशतकं लगावली आहेत.
मात्र रोहितने 2024 साली वर्ल्ड कप विजयानंतर टी 20I क्रिकेटमधून निवृत्त घेतली. त्यामुळे आता संजूकडे रोहितला मागे टाकत आयर्लंड विरुद्ध भारताकडून टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे.

संजूच्या किती धावा?

संजूने आयर्लंड विरुद्ध 3 टी 20I सामन्यांत 59 च्या सरासरीने आणि 171.01 च्या स्ट्राईक रेटने एकूण 118 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता रोहितला मागे टाकण्यासाठी संजूला या 2 सामन्यांत 84 धावा कराव्या लागणार आहेत.

आयर्लंड विरुद्ध भारत टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 26 जून, बेलफास्ट

दुसरा आणि अंतिम सामना, 28 जून, बेलफास्ट

संजू सॅमसन एकमेव

संजू सॅमसन भारताकडून आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. संजूनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन विराजमान आहे. ईशानने भारत विरुद्ध आयर्लंड 2 टी 20I सामन्यांत 29 धावा केल्या आहेत.

मुंबईकर सूर्यांश शेडगेचा समावेश

दरम्यान आयर्लंड विरूद्धच्या या टी 20i मालिकेसाठी मुंबईकर खेळाडूची निवड करण्यात आली आहे. ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे आयर्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे नितीशच्या जागी आयर्लंड विरुद्ध मुंबईकर फलंदाज सूर्यांश शेडगे याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता सूर्यांशला पदार्पणाची संधी मिळणार का? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in