• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran : इराणी राजदूत रशियामध्ये जे बोलला, त्यात दडलय भारताचं नुकसान

June 9, 2026 by admin Leave a Comment


स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा इराण आपल्या रणनितीक फायद्यासाठी पुरेपूर वापर करुन घेतोय. जगातल्या 20 टक्के तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. अमेरिका, इस्रायलचं नाक दाबण्यासाठी इराण होर्मुज स्ट्रेटचा आपल्या सोयीनुसार वापर करत आहे. आता या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजबद्दल नवीन अपडेट आहे. यावेळी इराण नाही, तर मॉस्कोमधून ही अपडेट आली आहे. इराणचे राजदूत तिथे बसतात. मॉस्कोमधील इराणी राजदूताने मोठं वक्तव्य केलं आहे. “होर्मुज स्ट्रेट खुलं राहिल पण इराण आणि ओमानच्या अटीनुसार. यात ट्रांजिट फि सुद्धा असेल’ असं मॉस्कोमधील इराणी राजदूताने म्हटलं आहे. अनेक तेल टँकर या हॉर्मुज स्ट्रेटमधून निघाले आहेत. पण लिक्विफाइड नेचुरल गॅस LNG, LPG चा पुरवठा अजूनही बाधित आहे.

इराणी राजदूत काजेम जलाली यांनी सोमवारी रशियन वर्तमानपत्र ‘इजवेस्टिया’ मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, “निश्चितच हॉर्मुज स्ट्रेट सुरु राहिलं. पण इराणी आणिओमानी अधिकाऱ्यांच्या अटी-शर्तीनुसार. इराण आणि ओमानकडून या स्ट्रेटशी संबंधित काही सेवा दिल्या जातात. त्या सेवांसाठी फि आकारली जाईल. एका स्थायी शांती करारातंर्गत स्ट्रेटमधून जाणाऱ्या जहाजांकडून फि घेण्याची परवानगी मिळाली पाहिजे. ही फि जहाजाचा प्रकार, त्यातील सामान आणि विद्यमान स्थितीनुसार वेगवेगळी असू शकते”

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलय?

हॉर्मुज स्ट्रेटमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याला डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध आहे. मे अखेरीस ट्रम्प यांनी ओमानला इशारा दिलेला की, इराणसोबत मिळून कुठलाही टोल आकारण्याचा प्रयत्न करु नका. असा कुठलाही टोल आकारण्याचा इरादा नाही असं ओमानच्या राजदूताने सांगितल्याचं ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट म्हणाले. रविवारी रात्री इराणने इस्रायलवर मिसाइल हल्ला केल्यानंतर बदला म्हणून इस्रायलने मध्य आणि दक्षिण इराणवर हल्ले केले. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना हल्ले करु नका असं सांगितलं होतं. पण नेतन्याहू यांनी हे आदेश धुडकावून हल्ले केले. जपान त्यांच्या गरजेचं जवळपास 95 टक्के तेल आखाती देशांमधून आयात करायचा. मे महिन्यात जपानचा एक तेल टँकर या मार्गावरुन कुठलही शुल्क न देता निघून गेला.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी आता फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक
  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in