
आयपीएल 2026 स्पर्धेतील 26वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. आरसीबीचा हा आयपीएलमधील 100 वा सामना असल्याने खास आहे. तसेच आजच्याच दिवशी आयपीएल स्पर्धेला 18 वर्षांपूर्वी सुरूवात झाली होती. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे हा सामना जिंकून पहिलं स्थान गाठण्याचा मानस असणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ 4 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली कॅपिटल्स कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, मी प्रथम गोलंदाजी करणार आहे. खेळपट्टी चांगली आणि कठीण दिसत आहे. चिन्नास्वामी हे अर्थातच धावांचा पाठलाग करण्यासाठी एक चांगले मैदान आहे. आम्ही त्याच संघासह मैदानात उतरणार आहोत. गेल्या काही सामने गमावल्यानंतर ही विश्रांती मिळणे चांगले आहे. आम्हाला आमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
Leave a Reply