• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी सावधान, एक चूक कराल तर…या गोष्टी तपासा मगच…

April 18, 2026 by admin Leave a Comment


Akshaya Tritiya 2026 : हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोनं खरेदी केल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होते असेही म्हटले जाते. या वर्षी येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. सकाळी 10.49 वाजता सोनं खरेदी करण्याचा मुहूर्त आहे. दरम्यान, अक्षय तृतीयेला अनेकजण सोनं खरेदी करत असले तरीही पैसे गुंतवताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. सोन्याची खरेदी करताना तुमच्यासोबत धोकाधडी होऊ शकते. जास्त भेसळ असलेलं सोनं तुम्हाला विकलं जाऊ शकतं. त्यामुळे सोन्याची शुद्धता कशी ओळखावी? ते जाणून घ्या….

सोनं खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?

सोन्याची शुद्धता तपासताना नेहमी तीन गोष्टी पाहिल्या पाहिजेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे सोन्याच्या दागिन्यावर असलेले त्रिकोणी निशाण. हे त्रिकोणी निशाण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) तर्फे दिले जाते. दागिन्यावर हे त्रिकोणी निशाण असेल तर ते बीआयएसद्वारे प्रमाणित आहे, असे मानले जाते. असा सोन्याचा दागिना खरेदी करण्यात कोणतीही अडचण नाही.

किती टक्के सोनं आहे, कसं ओळखावं?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आणखी एका गोष्टीकडे लक्ष द्यावे. तुम्ही खरेदी करत असलेल्या दागिन्यात किती टक्के सोने आहे हे ओळख्याची एक विशेष पद्धत आहे. 22k916 म्हणजे संबंधित दागिन्यात 91.6 टक्के सोने आहे. 18k750 म्हणजे दागिन्यात 75 टक्के सोने आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एचयूआयडी नंबर. हा एकूण 6 अंकी क्रमांक असतो. प्रत्येक दागिन्यासाठी हा अंक वेगळा असतो.

मॅग्नेट टेस्टच्या मदतीने ओळखा खरं सोनं

आजच्या डिजिटलच्या युगात तुम्ही फोनच्या माध्यमातूनही सोन्याची शुद्धता तपासू शकता. सरकारचे एक बीआयएस केअर हे अॅप आहे. हे अॅप डाऊनलोड करून तुम्ही एखाद्या दागिन्याची शुद्धता तपासू शकता. सगळी माहिती भरल्यास ज्वेलरचे नाव, हॉलमार्किंग अशी सर्व माहिती दिसेल. दुसरा एक पर्याय हा मॅग्नेट टेस्ट आहे. खरं सोनं लोहचुंबकाला चिपकत नाही. त्यामुळे खऱ्या सोन्याची तपासणी तुम्ही मॅग्नेट टेस्टच्या माध्यमातूनही करू शकता.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण युद्धाने नवा धोका वाढला, शॅडो वॉरची भीती, तपास यंत्रणा झाल्या अलर्ट
  • संधी मिळताच भविष्यात आम्ही…महिला आरक्षणावर मोदींचं सर्वात मोठं विधान; नेमकं काय घडणार?
  • विरोधकांना शिक्षा मिळणार, नारी शक्ती विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
  • Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या…नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!
  • CSK vs SRH: अभिषेक शर्माने 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करत हैदराबादसाठी नोंदवला विक्रम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in