• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होर्मुझ पुन्हा बंद होताच जगात खळबळ, इराणने थेट जहाजांवर… ट्रम्प यांनाही जबर धक्का!

April 18, 2026 by admin Leave a Comment


मध्य-पूर्वेत आता पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणने शनिवारी पुन्हा एकदा होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. आता ही घोषणा होताच इराणने होर्मुजमधून जात असलेल्या एका टँकरवर हल्ला करत गोळीबार केला. ब्रिटिश लष्कराने सांगितले की इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या दोन गनबोटी होर्मुजमधून जाणाऱ्या एका टँकरवर गोळीबार करत होत्या. यामुळे आता मध्य पूर्वेसह जगात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

इराणकडून जहाजावर गोळीबार

इराणकडून जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने सांगितले की, टँकर आणि त्यावरील कर्मचारी सुरक्षित आहेत. मात्र ब्रिटनने या जहाजाची ओळख किंवा ते कुठे जात होते याची माहिती सार्वजनिक केलेली नाही. यापूर्वी इराणने जाहीर केले होते की, अमेरिकेने इराणी जहाजवाहतूक आणि बंदरांवर लादलेल्या निर्बंधांच्या प्रत्युत्तरात या सामुद्रधुनीवर पुन्हा निर्बंध लागू करत आहे. गेल्या सात आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या काळात इराणने या मार्गातून प्रवास करणाऱ्या जहाजांना रोखत आहे. मात्र परवानगी असलेल्या जहाजांना होर्मुझ पार करताना कोणतीही अडचण येच नाहीये.

इराणच्या निर्णयाने जहाज वाहतूक विस्कळित होणार

हल्ला झालेल्या जहाजाच्या कॅप्टनने सांगितले की, ओमानपासून सुमारे 37 किलोमीटर (23 मैल) ईशान्येस इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या दोन गनबोटी त्यांच्या टँकरजवळ आल्या आणि कोणतीही चेतावणी न देता गनबोटीने टँकरवर गोळीबार सुरू केला. याआधी इराणने होर्मुज पुन्हा उघडण्याचा निर्णय मागे घेत या महत्त्वाच्या जलमार्गावर पुन्हा निर्बंध लागू केले होते. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकेबंदीची घोषणा केल्यानंतर इराणने हा निर्णय घेतला होता.

होर्मुझमधील तणाव वाढला

इराणच्या लष्करी कमांडने एका निवेदनात म्हटले की, अमेरिकेने इराणच्या बंदरांकडे येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांवरील नाकेबंदी कायम ठेवून दिलेला शब्द तोडला आहे. जोपर्यंत अमेरिका इराणकडे येणाऱ्या सर्व जहाजांना परवानगी देत नाही, तोपर्यंत होर्मुजमधील परिस्थितीवर कडक नियंत्रण ठेवले जाईल. इराणच्या घोषणेनंतर आता होर्मुझमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विरोधकांना शिक्षा मिळणार, नारी शक्ती विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
  • Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या…नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!
  • CSK vs SRH: अभिषेक शर्माने 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करत हैदराबादसाठी नोंदवला विक्रम
  • Weather update : उद्या घराच्या बाहेर पडणं टाळा, राज्यावर मोठं संकट, IMD कडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट
  • भारतासाठी अत्यंत मोठी खुशखबर, होर्मुझनंतर इराणचा आणखी मोठा निर्णय, आता एअरस्पेस…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in