• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Playoffs : राजस्थानच्या विजयासह प्लेऑफचे 4 संघ फिक्स, पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक

May 24, 2026 by admin Leave a Comment


रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली आहे. या निमित्ताने प्लेऑफचं वेळापत्रक जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci)

IPL 2026 Playoffs Teams

प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे 4 सामने होतात. प्लेऑफसाठी राजस्थानआधी गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पात्र ठरली आहे. (Photo Credit : IPL X Account)

RCB vs GT Qualifier 1 IPL 2026

प्लेऑफ फेरीला क्वालिफायर 1 पासून सुरुवात होणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये असलेल्या संघात क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येतो. या सामन्यात मंगळवारी 26 मे रोजी आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. (Photo Credit : Bcci and IPL X Account)

SRH vs RR Eliminator IPL 2026

त्यानंतर बुधवारी 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्याचा थरार रंगणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असणार्‍या संघांमध्ये हा सामना खेळवण्यात येतो. त्यामुळे या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी लढत पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : IPL X Account)

IPL Trophy

त्यानंतर शुक्रवारी 29 मे रोजी क्वालिफायर 2 मॅच होईल. क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता यांच्यात हा सामना होणार आहे. हा सामना मुल्लानपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)

IPL Trophy Dharamsala

तसेच 31 मे रोजी आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता संघ निश्चित होईल. क्वालिफायर 1 मधील विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 सामन्यातील यशस्वी संघ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit :PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : विकासनिधीवरुन सरकारवर होणारा मोठा आरोप स्वत: राऊतांनीच काढला खोडून
  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in