• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, MI vs PBKS: युजवेंद्र चहलने पंजाब किंग्सचं 40 धावांचं केलं नुकसान, श्रेयस अय्यरचा संताप

April 16, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर कर्णधार हार्दिक पांड्या यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. मात्र प्रथम फलंदाजी करण्याशिवाय पर्याय नव्हता. या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरूवात निराशाजनक झाली. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून मुंबईच्या फलंदाजांवर दडपण आणलं. पहिल्या षटकात अर्शदीप सिंगने रिकल्टनला अक्षरश: खेळवलं. त्यामुळे या षटकात फक्त एक धाव आली. दुसऱ्या षटकात धावसंख्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि मार्को यानसेनच्या गोलंदाजीवर 11 धावा आल्या. पण तिसऱ्या षटकात मुंबईच्या धावगतील ब्रेक लागला. कारण अर्शदीप सिंगने एका पाठोपाठ एक अशा दोन विकेट घेतल्या. रिकल्टन 2 धावा करून बाद झाला. तर सूर्यकुमार यादवला खातं खोलता आलं नाही. त्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत आला होता. पण पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युजवेंद्र चहलने चूक केली आणि त्याचा फटका बसला.

सूर्यकुमार यादवची विकेट पडल्यानंतर नमन धीरला वर खेळण्याची संधी मिळाली. त्याने 8 चेंडूत 10 धावा केल्या होत्या. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला मार्को यानसेनच्या गोलंदाजीचा सामना करण्याची संधी मिळाली. या चेंडूवर नमन धीरने मागे मारला आणि झेल हवेत उडाला. हा झेल थेट युजवेंद्र चहलच्या हातात होता, त्यामुळे नमन धीरही काही सेकंद हाताश झाला. पण युजवेंद्र चहलने सोपा झेल सोडला आणि नमन धीरला जीवदान मिळालं. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला आणि 50 धावांची खेळी केली. म्हणजेच 10 धावांवर असताना त्याचा झेल पकडला असता तर अतिरिक्त 40 धावा झाल्या नसता.

My fav Chahal dropped a catch because he was distracted flirting 😭.#MIvsPBKSpic.twitter.com/3F3Dl3SCES

— SHD766 (@MohdSha66621889) April 16, 2026

नमन धीरने 31 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत 50 धावांची खेळी केली. तसेच तिसऱ्या विकेटसाठी क्विंटन डी कॉकसोबत 122 धावांची भागीदारी केली. खरं तर अवघ्या 12 धावांवर 2 विकेट पडल्या होत्या. मात्र जीवदान मिळाल्याने नमन धीरने क्विंटन डीकॉकसह 122 धावांची भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढलं. नमन धीर 50 धावांवर असताना शशांक सिंहच्या गोलंदाजीवर झेव्हियर बार्टलेटने त्याचा झेल पकडला आणि त्याचा खेळ आटोपला. पण तिथपर्यंत त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GT vs KKR Live Streaming : केकेआर पहिल्या विजयासाठी सज्ज, गुजरातला पराभूत करणार?
  • MI vs PBKS : श्रेयस-प्रभसिमरनचा तडाखा, पंजाबचा 7 विकेट्सने जबरदस्त विजय, मुंबईचा सलग चौथा पराभव
  • Cheapest Oil India: जगातला कोणता देश भारताला सर्वात स्वस्त क्रुड ऑईल विकतो ?
  • अन् त्याने मला नको तिथे स्पर्श केला, सलमान खानसोबत स्क्रीन…प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला हादरवणारा प्रसंग!
  • रात्री झोपण्यापूर्वी करा या 4 गोष्टी, तुमच्या शरीराला चांगल्या झोपेसोबतच मिळतील आश्चर्यकारक फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in