• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, KKR vs GT: अजिंक्य रहाणे बोलून फसला! सहा वर्षानंतर नको ते घडलं, कोलकात्याचा संघ अडचणीत

April 17, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेच्या 25व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. त्यामुळे कोलकात्याच्या वाटेला मनासारखी प्रथम फलंदाजी आली. पण नाणेफेकीनंतर अजिंक्य रहाणेने फलंदाजांना निर्धास्तपणे खेळण्याची सूट दिली होती. पण अजिंक्य रहाणेच पहिल्या चेंडूवर तंबूत परतला. त्यामुळे अजिंक्य रहाणे नाणेफेकीनंतर जे काही बोलला, अगदी त्याच्या उलट झालं. अजिंक्य रहाणेने नाणेफेकीनंतर सांगितलं होतं की, नाणेफेक जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजी निवडली असती. कारण आम्हाला निर्धास्तपणे फलंदाजी करायची आहे. पण कर्णधार अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मोहम्मद सिराजचा गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. मिड ऑनला रबाडाने त्याचा अप्रतिम झेल पकडला. अजिंक्य रहाणे एकदमच निर्धास्तपणे खेळण्याच्या नादात विकेट फेकून आला.

आयपीएल स्पर्धेत अजिंक्य रहाणेला सहा वर्षानंतर असा दिवस पाहावा लागला. आयपीएल 2020 नंतर पहिल्यांदा शून्यावर बाद झाला. 50 डावानंतर अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेला कायमच मोहम्मद सिराजचा अडसर राहिला आहे. रहाणेने त्याच्या 38 चेंडूंचा सामना केला. त्यात फक्त 24 धावा केल्या. सिराजविरुद्ध रहाणेचा स्ट्राईक रेट हा 63.1 चा आहे. तर सिराजची 47 टक्क्यांहून अधिक चेंडू निर्धाव घालवले आहेत. सिराजने आयपीएल स्पर्धेत अजिंक्य रहाणेला दुसऱ्यांदा बाद केलं आहे. अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. इतकंच काय तर त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याच्या नेतृत्वात केकेआरने सर्व सामने गमावले आहेत.

गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जर गमावला तर कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण सहा सामन्यानंतर पदरात फक्त एकच गुण असेल. तर उर्वरित 8 पैकी 7 सामन्यात काही करून जिंकावं लागणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या सुरूवातीच्या टप्प्यातच केकेआरचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे उर्वरित सामन्यात कर्णधारपदी इतर कोणाचा विचार होऊ शकतो. पण सद्यस्थितीत केकेआर संघाकडे फॉर्मात असलेला एकही खेळाडू नाही. त्यामुळे त्याच्याकडे धुरा सोपवल्यास संघ चांगली कामगिरी करेल. आता केकेआर मॅनेजमेंटच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, हाती लागला मोठा जॅकपॉट, इराणच्या एका घोषणेनं गणितच बदललं
  • उत्तर-दक्षिण वादामुळे देश विभागू देणार नाही, अमित शहांनी संभ्रम पसरवणाऱ्या विरोधकांना सुनावलं
  • SA vs IND : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
  • BJP | भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
  • सर्वात स्वस्त 5 डिझेल ऑटोमॅटिक कार, गियर बदलण्याची कटकट संपली, किंमत फक्त 9.8 लाखांपासून सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in