
वुमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 17 एप्रलिला डरबनमधील किंग्समीडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे.
वस्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, काशवी गौतम, श्रेयांका पाटील, रेणुका सिंग ठाकूर आणि श्री चरणी.
दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : तझमिन ब्रिट्स, सुने लुस, लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादीन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.
Leave a Reply