• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, हाती लागला मोठा जॅकपॉट, इराणच्या एका घोषणेनं गणितच बदललं

April 17, 2026 by admin Leave a Comment


युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं होतं. यामुळे भारतासह जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यापैकी सुमारे 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. मात्र हा मार्ग बंद झाल्यामुळे भारताची मोठी अडचण निर्माण झाली होती. भारताला मोठा फटका बसला होता. देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. मात्र आता मोठी गुड न्यूज समोर आली आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा जगासाठी ओपन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होताच दुसऱ्याच दिवशी इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज जगासाठी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्याची घोषणा करताच भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने तब्बल 49 दिवस स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. मात्र त्यानंतर आता स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा ओपन झाला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा सुरू होताच कच्च्या तेलाच्या किमंतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांची घसरण झाली आहे, तर एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये पहिल्याच दिवशी 8.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे आणि गॅसचे भाव कमी झाल्यामुळे याचा थेट फायदा आता भारताला होणार आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारताने रशियाकडून तेलाची खरेदी वाढवली होती, मात्र युद्धाचा फायदा घेत रशियाने आपल्या कच्च्या तेलाचे दर वाढवले होते. मात्र आता भारताला स्वस्तात कच्च तेल उपलब्ध होणार आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी आज स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्याची घोषणा करताच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरलमागे 10.59 डॉलरने कमी होऊन 88.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. तर गॅसचे दर देखील कमी झाले आहेत. दरम्यान भारताला याचा डबल फायदा झाला आहे, एक म्हणजे आता कच्चं तेल स्वस्त झाल्याने देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात. तर दुसरं म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन झाल्यामुळे आता देशातील इंधन तुटवडा दूर होणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in