• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला…

June 1, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मजबूत पकड राहिली. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीला बाद केलं. त्यामुळे हा सामना पावरप्लेपासूनच आरसीबीच्या पारड्यात झुकलेला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा या जोस बटलरच्या फलंदाजीकडे झुकलेल्या होत्या. कारण बटलर कायम मोठ्या सामन्यात घातक ठरलेला आहे. पण अष्टपैलू कृणाल पांड्याने त्याच्या पुढ्यात एक जादुई चेंडू टाकला. त्या चेंडूचा सामना करताना जोस बटलर फसला. त्याने टाकलेल्या चेंडूचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं कौतुक केलं. कृणाल पांड्याने या सामन्यात त्याने फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखलं.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने संघाचं 13वं षटक कृणाल पांड्याच्या हाती सोपवलं. जोस बटलर क्रीजवर सेट झाला होता. त्याने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी पुढे आला. कृणाल पांड्याने त्याची रणनिती आधीच हेरली आणि त्याच्यापासून चेंडू लांब ठेवला. वेगाने यॉर्कर लेंथ यॉर्कर टाकला. त्यामुळे जोस बटलरने शेवटच्या क्षणी चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट विकेटकीपर जितेश शर्माच्या हातात गेला. त्याने जराही चूक न करता त्याला यष्टीचीत केलं.

The Man of Finals doing what he does best! 🫡

Krunal Pandya outsmarts Jos Buttler and #RCB are roaring 🔥

Updates ▶ https://t.co/Yz6K3q6w0X#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/L3UkTRyhBg

— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026

सचिन तेंडुलकरने केलं कौतुक

कृणाल पांड्याची समयसूचकता पाहून सचिन तेंडुलकरनेही त्याचं कौतुक केलं. त्याने सोशल मीडियावर कृणाल पांड्याच्या चेंडूची स्तुती करणारी पोस्ट केली. यात सचिन तेंडुलकरने लिहिलं की, ‘कृणाल पांड्याचा काय अप्रतिम चेंडू होता! चेंडू सोडण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने फलंदाजाच्या पायांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आणि मग एक अचूक चेंडू टाकून त्याला ड्रेसिंग रूममध्ये परत पाठवले.’

What a fabulous delivery by @krunalpandya24! He watched the batter’s feet until the very last moment before releasing the perfect ball to send him back to the dressing room.

— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 31, 2026

गुजरात टायटन्सने या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 155 धावा केल्या. तसेच विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान आरसीबीसाठी खूपच सोपं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..
  • मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं
  • Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी
  • मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in