• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

International Yoga Day Today LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकतामध्ये योगाभ्यास, तब्बल 35 हजार लोक..

June 21, 2026 by admin Leave a Comment


आज जागतिक योगा दिन आहे. यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकता येथील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 35 हजार लोकांसोबत योगा करणार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि काही मंत्रीही या योग दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. योग हा केवळ शारीरिक श्रम नाही असल्याचे मोठे विधान यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी केले. योगा फॉर हेल्दी एजिंग ही यंदाची थीम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोलकत्यातील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत. फक्त देशातच नाही तर जगभरात जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. आज 12 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. योग सर्वांना जोडतो, असेही मोठे विधान नरेंद्र मोदी यांनी यादरम्यान केले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी योगाचे महत्व सांगताना दिसले.

नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, पश्चिम बंगाल, कोलकातामध्ये स्वच्छतेसाठी जे योगदान दिले जात आहे, त्यासाठी मी कोलकातावासीयांचे कौतुक करेन. योग दिनाच्या निमित्ताने आज बंगालमध्ये असणे हे विशेष आहे. ही ती भूमी आहे जिथे भगवान रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या सिद्ध संतांनी अवतार घेतला. येथूनच स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली.

लाहिरी महाशय यांच्यासारख्या महान योग्यांनी जिथे योग परंपरेला नव्या उंचीवर नेले, अशा या पवित्र भूमीवर आज सामूहिक योगाचा अनुभव एक वेगळीच अनुभूती देत आहे. इथे अनेक लोक एकत्र आले आहेत. हेच एकत्र येणे म्हणजे योगाचा खरा भाव आहे. योग हा मानवी जीवनासाठी चेतनेबरोबरच ऊर्जेचा आणि प्रकाशाचाही स्रोत आहे. आपले वय वाढले तरी आपण निरोगी राहू शकतो, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

राज्यात जुहू बीचवरही योगा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस योगातील काही आसनही करताना दिसले. आज देशभरात विविध योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकांमध्ये एक उत्साह या योगादिनानिमित्त बघायला मिळत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिसवरील टाईम ओव्हर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटीवर धडकणार, कधी आणि कुठे येणार पाहता?
  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in