• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Inflation: तेल, चहा, कॉफी, शॅम्पू, सूप… घरगुती वापरातील सगळ्या वस्तू महागणार, मध्यमवर्गीयांच्या खिशाचा ताण वाढणार, कारण काय?

July 29, 2026 by admin Leave a Comment


दैनंदिन वस्तूंच्या किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) सप्टेंबर तिमाहीत अनेक उत्पादन श्रेणींमध्ये किमती वाढवू शकते, असे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने मंगळवारी जाहीर केले. एप्रिल-जून 2026 च्या कालावधीच्या तुलनेत चालू तिमाहीत किमतींमध्ये 2 ते 5 टक्के वाढ होण्याचा कंपनीचा अंदाज आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची एफएमसीजी कंपनी आहे. ही कंपनी डिटर्जंट, चहा, कॉफी, फ्लोअर क्लीनर, शॅम्पू, टूथपेस्ट, फेस क्रीम, साबण, जॅम, सूप, हेल्थ ड्रिंक पावडर आणि सौंदर्य प्रसाधने यांसारख्या विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करते. त्याच्या प्रमुख ब्रँड्समध्ये व्हील्स, बूस्ट, हॉर्लिक्स, रेड लेबल, ताजमहाल, ब्रू, क्लोज-अप, क्लिनिक प्लस, डव्ह, हमाम, इंदुलेखा, किसान जॅम, नॉर सूप, लक्स, लॅक्मे, लाइफबॉय, पॉन्ड्स, पिअर्स, पेप्सोडेंट, रिन, रेक्सोना, विम, व्हॅसलीन, सनसिल्क आणि सर्फ एक्सेल यांचा समावेश आहे.

विविध श्रेणींमध्ये कार्यरत असलेल्या या आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने आर्थिक वर्ष  2026-27 च्या पहिल्या तिमाहीत किमती 2-5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. तिमाही निकालानंतर माध्यमांशी बोलताना, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक, प्रिया नायर म्हणाल्या की, “विक्रीच्या प्रमाणात होणारी वाढ कायम ठेवत, कंपनी चालू तिमाहीतही संतुलित आणि टप्प्याटप्प्याने दरवाढीची कारवाई सुरू ठेवेल. “एकंदरीत, परिस्थिती अस्थिर असल्याचे आम्हाला दिसते. पश्चिम आशियातील संकट असो किंवा मान्सून आणि एल निनोचा परिणाम असो, आम्ही या सर्वांवर लक्ष ठेवून आहोत,” असे प्रिया नायर म्हणाल्या. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या सीईओ आणि एमडी प्रिया नायर यांनी सांगितले की, सप्टेंबर तिमाहीत महागाई क्रमशः वाढण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

प्रिया नायर यांनी पुढे सांगितले की, “विक्रीच्या प्रमाणावर आधारित वाढ हे हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्राधान्य आहे.  आम्ही विक्रीच्या प्रमाणावर आधारित महसूल वाढीवर लक्ष केंद्रित करत आहोत, तेच आमचे प्राधान्य राहील.” हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निरंजन गुप्ता म्हणाले की, “कंपनीने जून तिमाहीत किमतींच्या माध्यमातून महागाईचा केवळ अर्धा भार ग्राहकांवर टाकला होता.”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in