• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Indian Railway: रेल्वेत चोरी झाली चादर, टॉवेल; कोणाकडून वसूल होते नुकसान भरपाई?

July 14, 2026 by admin Leave a Comment


Indian Railway Compensation Rules: आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वे एसी डब्यात बेडशीट, टॉवेल, उशी आणि ब्लँकेटची सुविधा पुरवते. काही प्रवाशी या वस्तू चोरतात. काही जण पकडलेही जातात. त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई होते. अनेकदा प्रवासी निसटतात. माहितीच्या अधिकारातंर्गत (RTI) मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी हजारो चादरी आणि टॉवेल मोजणीत कमी आढळतात. रेल्वेला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसतो. मग या वस्तूची वसूली कशी होते? त्याची नुकसान भरपाई मिळते कशी?

या चोरीची जबाबदारी कोणाची?

प्रवाशी, भुरटे चोर अथवा काही प्रकरणात कर्मचारी हे साहित्य चोरतात. या चोरीची भरपाई कोण करते? रेल्वेच्या नियमानुसार, डब्यातील बेडरोलची जबाबदारी ही कोच अटेंडंट अथवा बेडरोल पुरवठा करणाऱ्या आऊटसोर्सिंग कंपनीची असते. रेल्वे सुटल्यानंतर ती तिच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचेपर्यंत सर्व बेडरोल, लिननची सुरक्षा ही संबंधित अटेंडंटकडे असते. त्याचे काम सुरू झाल्यावर तो डेपोकडून ठराविक संख्येत हे साहित्य घेतो. त्याची रीतसर नोंद होते. प्रवास संपल्यानंतर ट्रेन यार्डमध्ये उभी राहते. लिनन विभाग एसी डब्यातील साहित्याची, वस्तूंची संख्या पुन्हा मोजते. या तपासणीत चादर, उशी अथवा टॉवेल कमी आढळल्यास, या वस्तूंची किंमत संबंधित अटेंडेंटच्या पगारातून वसूल होते. त्याचा पगार कापल्या जातो.

कंत्राटदाराच्या बिलातून रक्कम होते वजा

अनेक मार्गावर बेडरोल पुरवठ्याचे काम खासगी कंत्राटदारांकडे असते. रेल्वे डब्यातून बेडशीट, टॉवेल, उशी आणि ब्लँकेटची चोरी झाल्यास, साहित्य कमी आढळल्यास त्याची भरपाई संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात येते. त्याच्या मासिक बिलातून ही रक्कम कपात होते. या भरपाईला अनेक कंत्राटदार आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. रेल्वेतून बाहेर पडत असलेल्या प्रवाशांच्या बॅग तपासणे अथवा त्यांचे सामान त्यांना दाखवायला लावणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. साहित्य प्रवाशीच नेतात हे जर माहिती आहे, तर त्याची जबाबदारी कंत्राटदार अथवा कर्मचार्‍यांकडून भरपाई करणे योग्य नसल्याचा दावा करण्यात येतो.

हे नुकसान कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आता ट्रेन्समध्ये नियमीतपणे अचानक तपासणी करतात. तर रेल्वे थांबल्यावर संबंधित एसी डब्याची तपासणी होते. काही घटनेत प्रवाशी पकडले जातात. त्यांच्याविरोधात रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) अधिनियम, 1966 अंतर्गत कठोर कारवाई होते. चादर, ब्लँकेट, उशी अथवा इतर मालमत्ता चोरताना प्रथम पकडल्यास संबंधित व्यक्तीला कमाल 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होतो. प्रवाशाला 1 हजारांचा दंड होऊ शकतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in