• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India vs Japan: क्रिकेट इतिहासात भारत आणि जापान पहिल्यांदाच भिडणार, जाणून घ्या ऐतिहासिक सामन्याबाबत

September 4, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ एशियन गेम्स 2026 स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपलं सुवर्ण पदक वाचवण्यासाठी मैदानात उरणार आहे. असं असताना बीसीसीआयने या स्पर्धेसाठी आपला संघ आधीच जाहीर केला आहे. या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता वाढली आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी भारताचा सामना यजमान जापानशी होणार आहे. क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि जापान पुरूष संघात सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. बीसीसीआय आणि जापान क्रिकेट असोसिएशनने या ऐतिहासिक सामन्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 4 सप्टेंबरला याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. हा सामना 22 सप्टेंबरला होणार आहे.

भारत आणि जापान यांच्यातील एकमेव सामन्याला सुजुकी कप असं नाव दिलं गेलं आहे. हा सामना तोचिगि प्रीफ्रॅक्चरच्या सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार 22 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता या सामन्याला सुरूवात होईल. भारत आणि जापान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि जापान यावर्षी द्विपक्षीय संबंधांची 75 वर्षे साजरी करत आहे. हा सामना या सोहळ्याची सुरुवात आहे. भारत जापान यांच्यात सहकार्य वाढावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानी पंतप्रधान सनाए ताकाइची यांची एक भेट झाली होती. या भेटीदरम्यान स्पोर्ट्स 75 मोहिमेची सुरूवात केली होती. त्याचाच भाग म्हणून टी20 सामना होत आहे.

𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗜𝗻 𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗸𝗶𝗻𝗴!

India🇮🇳 🤝 Japan🇯🇵#TeamIndia set to play a historic T20I against Japan to launch the celebrations of the 7⃣5⃣th Anniversary of India-Japan Diplomatic Relations. 👏👏@CricketJapan

All The Details 🔽https://t.co/vxdhuT1tgp pic.twitter.com/DQmPncvefH

— BCCI (@BCCI) September 4, 2026

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना खेळणार

भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जापान दौऱ्यावर जाणार आहे. एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेत भाग घेणार आहे. हाच संघ जापानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारत आणि जापान हे संघ अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भिडले आहेत. वरिष्ठ पातळीवर हा सामना पहिल्यांदाच होणार आहे. एशियन्स गेम्स स्पर्धेत भारताचा पहिला सामना 28 सप्टेंबरला होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in