• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार

June 23, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची सर्वाधिक झळ कुठल्या देशाला बसली तर तो आहे संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAE. यावर्षी 28 फेब्रुवारीला हे युद्ध सुरु झालं. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करताच इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांवर हल्ले सुरु केले. महिन्याभरापेक्षा जास्त काळ चाललेल्या या युद्धात संयुक्त अरब अमीरातवर इराणकडून सर्वाधिक हल्ले झाले. युद्धविरामाच्या काळातही अधनं-मधनं यूएईवर हल्ले सुरु होते. या युद्धानंतर संयुक्त अरब अमीरातने आता आपल्या सुरक्षेचा नव्याने विचार सुरु केला आहे. याआधी यूएईची सुरक्षेसाठी सर्वाधिक भिस्त अमेरिकेवर होती. सुरक्षेसाठी ते पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून होते. पण इराणच्या हल्ल्यांमधून एक गोष्ट त्यांना कळून चुकली, ती म्हणजे अमेरिका आपलं रक्षण करु शकत नाही. आपल्याला स्वत:लाच सुरक्षेसाठी काही पावलं उचलावी लागतील.

म्हणून संयुक्त अरब अमीरातने आता स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टीने काही पावलं उचलली आहेत. UAE ला भारताच्या दोन शस्त्रांमध्ये विशेष रस आहे, एक म्हणजे ब्रह्मोस आणि दुसरं आकाशतीर एअर डिफेन्स सिस्टिम. या दोन्ही शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी भारत आणि यूएईमध्ये प्राथमिक स्तरावरची बोलणी सुरु झालेली आहेत. महत्वाचं म्हणजे ब्रह्मोस आणि आकाशतीर या दोघांनी पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. ब्रह्मोसने पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि एअरफोर्सचे बेस उद्धवस्त केलं. पाकिस्तानकडे ब्रह्मोसला रोखण्याचं कुठलही उत्तर नव्हतं. आकाशतीरमुळे पाकिस्तानचं एकही क्षेपणास्त्र भारतापर्यंत पोहोचू शकलं नाही. हवेतच ही सर्व मिसाइल्स नष्ट झाली.

ताकद कैकपटीने वाढेल

त्यामुळे संयुक्त अरब अमीरातने भारताकडून ही दोन शस्त्र विकत घेण्यात इंटरेस्ट दाखवला आहे. यात आकाशतीर भारत यूएईल देऊ शकतो. कारण आकाशतीर ही भारताची स्वदेशी सिस्टिम आहे. पण ब्रह्मोस यूएईला देण्यासाठी भारताला रशियाची परवानगी घ्यावी लागेल. कारण ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेलं आहे. त्यामुळे यूएईला हे क्षेपणास्त्र देण्यासाठी रशियाची परवानगी लागेल. इराण आणि रशियाची घनिष्ठ मैत्री आहे. आता युद्ध काळातही रशियाने इराणला पडद्यामागून बरीच मदत केली होती. अशावेळी इराणच्या शत्रुला आणि अमेरिकेच्या मित्रा ब्रह्मोस विकण्यासाठी रशिया परवानगी देईल का? या बद्दल थोडा संशय आहे. पण ब्रह्मोस आणि आकाशतीर यूएईच्या ताफ्यात आल्यास त्यांची ताकद कैकपटीने वाढेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in