• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM: मालिका जिंकली तरीही कॅप्टन श्रेयस अय्यर म्हणतोय अजून काम बाकीच, असं का म्हणाला?

July 26, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आणि आता एक उर्वरित सामना आज रंगणार आहे. दोन सामने जिंकल्यामुळे आता भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली आहे. आता ही मालिका जिंकली तर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघ पहिली टी-20 मालिका जिंकेल. आता सामना संपताच कर्णधार श्रेयस अय्यरने एक विधान केले ज्यामुळे भारतीय संघाने टेन्शन वाढले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध 90 धावांनी विजय मिळवल्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले की, “वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला झालेल्या दुखापतीमुळे रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी20 सामन्यात संघाला काही बदल करावे लागू शकतात. ” आपल्या दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकत असताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे यादवला मैदान सोडावे लागले. दुखापत होण्यापूर्वीच त्याने दोन बळी घेतले होते.

दुसऱ्या टी20 सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात, यजमान झिम्बाब्वेला 17.5 षटकांत केवळ 129 धावाच करता आल्या. भारताकडून इशान किशनने 81 आणि तिलक वर्माने नाबाद 60 धावा केल्या. या विजयामुळे भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यातील भारताच्या विजयानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “दुर्दैवाने, आमचा एक खेळाडू जखमी आहे, त्यामुळे उद्याच्या (रविवारच्या) सामन्यासाठी संघात काही बदल दिसू शकतात. ईशान आणि तिलकने शानदार फलंदाजी केली. मला वाटले होते की या खेळपट्टीवर 180 ते 200 धावा एक स्पर्धात्मक धावसंख्या असेल, पण आम्ही 220 धावा केल्या, जे संघासाठी बोनस ठरले. मैदानावर आपली हीच वृत्ती असायला हवी. वर्तमानात राहणे आणि आपल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”

तरुण संघाच्या निर्भय वृत्तीबद्दल अय्यर म्हणाला, “होय, खेळाकडे पाहण्याचा हाच दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. मला वाटते की हे सर्व वृत्तीवर अवलंबून असते. भूतकाळातील कामगिरीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका. पुढे जात राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागतो. उद्या आणखी एक संधी आहे, त्यामुळे आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.”



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
  • रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपाय
  • Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in