• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SLC XI : इंग्लंड पाठोपाठ श्रीलंकेतही भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था, नशिबाने मिळाला विकेट

August 7, 2026 by admin Leave a Comment

IND vs SLC XI Practice Match Day 1 : श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजला सुरुवात होण्याआधी भारतासाठी एक निराशाजनक बातमी आहे. आयर्लंड, इंग्लंडसारखीच भारतीय संघाची श्रीलंकेमध्ये स्थिती आहे. श्रीलंकेविरुद्ध मुख्य कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी सराव सामना खेळवला जात आहे. नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाच्या वाट्याला गोलंदाजी आली. तीन दिवसाच्या सराव सामन्यात पहिल्याचदिवशी भारताने खराब सुरुवात केली आहे. भारताचे वेगवान आणि फिरकी गोलंदाज श्रीलंकेच्या सलामीवीरांसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकन सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर निशान फर्नांडोने टी20 स्टाइलमध्ये फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. निशान फर्नांडोने 65 चेंडूत 66 धावा फटकावल्या. यात 11 चौकार आणि 1 षटकार आहे. दुसऱ्याबाजूला रविंदु रसंथाने त्याला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी 5 पेक्षा जास्त इकॉनमी रेटने धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये अशी फलंदाजी फार कमीवेळा पहायला मिळते. कसोटी सामन्यात त्यांनी वनडे स्टाइल सुरुवात केली.

या जोडीने पहिल्या विकेटसाठी 20.4 ओव्हर्समध्ये 110 धावा केल्या. आपसातील समन्वय जुळून न आल्याने ही जोडी फुटली. इनिंगच्या 21 व्या ओव्हरमध्ये रन्स चोरताना निशान फर्नांडो रनआऊट झाला. निशान फर्नांडोला 1 रन्स काढायचा होता. पण रविंदु रसंथा त्याला मनाई केली. दोघेही बॉलरच्या एन्डवर पोहोचले. यशस्वी जैस्वालने सुद्धा चुकीच्या एंडवर थ्रो केला. पण मानव सुथारने लगेच ऋषभ पंतच्या दिशेने थ्रो केला. पण हा थ्रो सुद्धा स्लिपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलकडे गेला. पण सुदैवाने रनआऊट करण्यात यश आल्याने भारताला पहिला विकेट मिळाला.

हे चांगले संकेत नाहीयत

भारतीय गोलंदाजांना या प्रॅक्टिस मॅचमध्ये सुरुवातीला विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. कॅप्टन केएल राहुलने वेगवान आणि फिरकी दोन्ही गोलंदाजांचा वापर केला. पण कुठलाही गोलंदाज यश मिळवून देऊ शकला नाही. मोहम्मद सिराजने 5 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या. प्रसिद्ध कृष्णाने 5 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या. रवींद्र जाडेजा सुद्धा पहिल्या पाच ओव्हरमध्ये यश मिळवून देऊ शकला नाही. गुरनूर बराड महागडा गोलंदाज ठरला. मुख्य टेस्ट सीरीजला सुरुवात होण्याआधी हे चांगले संकेत नाहीयत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
  • सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral
  • Manoj Jarange : सरकारला धडकी भरवणारी घोषणा! मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, 29 तारखेला काय होणार?
  • मालकाच्या मृत्यूनंतर कुत्र्याने दाखवली निष्ठा; 41 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकताना प्रत्येकजण रडतो
  • मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in