• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: श्रीलंकेचं गॉल मैदान 391 धावांसह भारताच्या या खेळाडूने गाजवलं, सचिन-द्रविड-लक्ष्मण फेल

August 10, 2026 by admin Leave a Comment


भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात खेळला जाणार आहे. या मैदानात दिग्गज खेळाडूंनी खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण सचिन तेंडुलकरची बॅट या मैदानात कधी चालली नाही. असं असताना एका खेळाडूने हे मैदान मात्र गाजवलं आहे. (Photo: BCCI Twitter)

भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागला हे मैदान चांगलं भावलं आहे. त्याने या मैदानात खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्याने गॉलमध्ये दोन कसोटी सामन्यात एकूण 391 धावांची खेळी केली आहे. (Photo: Getty Image)

वीरेंद्र सेहवागने गॉलमध्ये 130.33 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 90 पेक्षा जास्त होता. यात एक शतक, एक द्विशतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. (Photo: Getty Image)

गॉलमध्ये शिखर धवनने देखील चांगली फलंदाजी केली आहे. त्याने दोन कसोटी सामन्यात 91.50 च्या सरासरीने 366 धावा केल्या ठआहेत. त्याने गॉलमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. (Photo: Getty Image)

गॉलमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण या सारखे दिग्गज खेळाडू मात्र फेल गेले आहेत. द्रविडने 36पेक्षा जास्तीच्या सरासरीने 181 धावा, लक्ष्मणने 35.75 च्या सरासरीने 143 धावा आणि सचिन तेंडुलकरने 32 च्या सरासरीने फक्त 128 धावा केल्या आहेत. (Photo: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in