• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामना

August 1, 2026 by admin Leave a Comment

Ind vs SL Test Series Schedule: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं गणित सोडवायचं असेल, तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा भारताचं गणित खूपच किचकट होईल. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडिया लोकल श्रीलंकन इलेव्हनसोबत एक वॉर्म मॅच खेळणार आहे. या सामन्याच्या वेळापत्रकात एक बदल करण्यात आला आहे. या सराव सामन्याचा एक दिवस कमी करण्यात आला आहे. यापूर्वी हा सामना चार दिवसांचा असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण आता तीन दिवसांचा होणार आहे. हा सराव सामना 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान कोलंबोच्या एनसीसी ग्राउंडमध्ये खेळला जाईल. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी 4 ऑगस्टला रवाना होणार आहे.

टीम इंडियाला दिली अशी माहिती

बीसीसीआयने संघ निवडीच्या वेळी चार दिवसांचा सराव सामना असेल अशी घोषणा केली होती. पण आता बदल झाल्याची माहिती संघाला दिली गेली आहे. पण या सामन्याचा एक दिवस कमी करण्याचं कारण काय ते अद्याप कळू शकलेलं नाही. पण बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटच्या सूत्रांनी सराव सामन्यात बदल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. जून महिन्यात भारताने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अनौपचारिक कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला आणि जिंकला होती. त्यामुळे मागच्या एक महिन्यात कसोटी भारताची तयारी कशी आहे, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे हा सराव सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे हा वॉर्म अप सामना लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार आहे.

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा

  • 3-दिवसीय वॉर्म-अप सामना: 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट (एनसीसी ग्राउंड, कोलंबो)
  • पहिला कसोटी सामना: 15 ऑगस्टपासून (गाले इंटरनेशनल स्टेडियम)
  • दुसरा कसोटी सामना : 23 ऑगस्टपासून (एसएससी स्टेडियम, कोलंबो)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारताला एकूण 9 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो.भारतीय श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतासमोरचं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
  • Kangana Ranaut : भूखे-नंगे लोग…कंगना रनौत पुन्हा संतापल्या, रामदेव बाबांविषयी बोलताना म्हणाल्या… ते विधान चर्चेत!
  • विद्यार्थी भीक नव्हे तर…राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्वीट, पुण्यातील उपोषणाचा मुद्दा तापणार!
  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in