
IND vs SL Test Series: भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी सरफराज खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकाही सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही, तो मैदानावर फक्त फिल्डींग करायला येतो. पण आता दुसरीकडे सर्फराज खानचा भाऊ मात्र मैदान गाजवत आहे.
मुशीर खानने दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात ९६ धावा केल्या, थोडक्यासाठी त्याचे शतक हुकले. शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची त्याला चांगली संधी होती, पण त्याच्या बाद होण्याने वेस्ट झोनच्या डावाला खीळ बसली. सामन्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, वेस्ट झोनची धावसंख्या २२०/७ आहे, आणि ते विजयापासून अजून ६७ धावा दूर आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयी संघ निश्चित होईल.
या सामन्यात वेस्ट झोनने ८४ धावांत तीन गडी गमावले, पण त्यानंतर मुशीर खान आणि ऋतुराज गायकवाड यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी करून वेस्ट झोनला सामन्यात परत आणले. या दोन फलंदाजांनी १३८ चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. गायकवाडची खेळी खूपच वेगवान होती, त्याने अवघ्या ७० चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. जर वेस्ट झोनने हा सामना जिंकला, तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना साऊथ झोनशी होईल.
सर्नराज खान अजूनही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपल्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या तो संघात फक्त फिल्डींगसाठी येत आहे. तो भारतासाठी शेवटचा ३ नोव्हेंबर २०२४ रोजी खेळला होता. तेव्हापासून तो आपल्या संधीच्या शोधात आहे. आपल्या लहान भावाप्रमाणेच सर्फराजने ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत, पण टीम इंडियाकडून पुन्हा खेळण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे, पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला तर आता दुसरा कसोटी सामनाही जिंकण्याच्या तयारीत आहे.
Leave a Reply