• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: बीसीसीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, विदर्भकर अन् मुंबईकर खेळाडूही श्रीलंकेला जाणार, असं का?

August 4, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने रंगणार आहे. या सामन्यांना 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे, या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ आज श्रीलंकेला जाण्यासाठी रवाना होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या संघात अचानक एक मोठा बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहा हा फिटनेसमुळे संघात सामील होऊ शकणार नाही यामुळे आता आकिब नबी दार याला संधी मिळाली आहे. पण आता या सोबतच भारतीय संघासोबत एक विदर्भकर आणि एक मुंबईकर खेळाडूही श्रीलंकेला जाणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, तनुश कोटियनने स्पष्ट केले की, तो वांद्रे येथील या अकादमीमध्ये वारंवार सराव करतो, कारण येथे पावसातही सरावासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहेत. येथील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त आहेत. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल हे देखील गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत येथे सराव करत आहेत. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठीच्या मुख्य संघात मुंबईकर तनुष कोटियन आणि विदर्भकर हर्ष दुबे यांचा समावेश नसला तरी, त्यांच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासोबत नेट गोलंदाज म्हणून श्रीलंकेला जाणार आहेत. तिथे ते रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार आणि सारांश जैन यांसारख्या प्रमुख फिरकी गोलंदाजांना सराव सत्रांमध्ये मदत करतील.

आता श्रीलंकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी, भारताचे दोन प्रमुख फलंदाज, केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल, मुंबईत एकत्र सराव करताना दिसले. मुंबईत मुसळधार पाऊस आणि खराब हवामान असूनही, या दोन्ही खेळाडूंनी आपला सराव थांबवला नाही. पाऊस टाळण्यासाठी, त्यांनी वांद्रे पश्चिम येथील विंग्स स्पोर्ट्स सेंटरमध्ये इनडोअर सराव केला. भारताचे माजी खेळाडू जतीन परांजपे यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या या केंद्रावर, हे दोन्ही खेळाडू गेल्या काही दिवसांपासून अथक परिश्रम घेत आहेत. या सरावाचे वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांऐवजी केवळ फिरकी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले.

श्रीलंकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, राहुल आणि जयस्वाल यांनी ऑफ-स्पिनर्स, लेग-स्पिनर्स आणि डावखुरे फिरकी गोलंदाज अशा सर्व प्रकारच्या गोलंदाजांचा सामना केला. या काळात, मुंबईचा फिरकी गोलंदाज तनुष कोटियन आणि अनेक स्थानिक गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांसाठी त्यांना पूर्णपणे तयार करण्यासाठी गोलंदाजी केली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
  • अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात? कारण आहे खास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in