• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL : पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग 11, गिल-गंभीर या चार खेळाडूंचा पत्ता कापणार!

August 10, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने वॉर्मअप सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आणि तयारींचा आढावा घेतला. खरं तर पहिल्या दिवसावर श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने पकड मिळवली होती. पण त्यानंतरच्या दोन दिवसांवर भारताची मजबूत पकड राहिली. आता खऱ्या अर्थान 15 ऑगस्टपासून कसोटी लागणार आहे. भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्याला सुरूवात होणार असून प्लेइंग 11 बाबत डोकेफोडी करावी लागणार आहे. कारण आधीच संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यानंतर रिप्लेसमेंट म्हणून आकिब नबी आणि सरफराज खान हे संघात आले. मात्र प्लेइंग 11 मध्ये या दोघांचा विचार केला जाईल हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे प्लेइंग 11 निवडतात कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

प्लेइंग 11 मध्ये कोणाला मिळणार संधी ?

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ओपनर जोडीत तसा काहीच फरक पडणार नाही. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही जोडी मैदानात उतरेल. पहिल्या डावात जयस्वाल फेल गेला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने कमबॅक केलं. तर केएल राहुल देखील लयीत आहे. साई सुदर्शन संघातून बाद झाल्यानंतर वॉर्मअप सामन्यात शतक ठोकलेल्या देवदत्त पडिक्कल याने तिसऱ्या स्थानावर दावा ठोकला आहे. त्यामुळे त्याचं तिसऱ्या स्थानी खेळणं नक्की आहे. कर्णधार शुबमन गिल दुखापतीतून सावरला असून सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने फलंदाजी केली. त्यामुळे चौथ्या स्थानावर शुबमन गिल खेळेल हे निश्चित आहे. पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचं नाव असेल. तर सहाव्या क्रमांकावर सरफराज खानला संधी मिळू शकते. फिरकीचा सामना करण्यास सक्षम आहे.

सातव्या क्रमांकासाठी अष्टपैलू रवींद्र जडेजा असेल यात काही शंका नाही. त्यानंतर फिरकी खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन मानव सुथार आणि कुलदीप यादव प्लेइंग 11 मध्ये असतील. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि गुरनूर ब्रार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या खेळाडू व्यतिरिक्त इतर चार खेळाडूंना संघात स्थान मिळणं कठीण दिसत आहे.

प्लेइंग 11 मधून कोणाचा पत्ता कापणार?

सराव सामन्यातील कामगिरी आणि टीम इंडियाचं संयोजन पाहता चार खेळाडूंचा पत्ता कापला जाण्याची शक्यता वाढली आहे. प्लेइंग 11 मधून आकिब नबी, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि सारांश जैन यांना वगळलं जाण्याची शक्यता अधिक आहे. सराव सामन्यात आकिब नबीला गोलंदाजीची संधी तशी कमी मिळाली. पण त्यातही त्याला फार काही ग्रेट करता आलं नाही. त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे त्याला संधी मिळणं खूपच कठीण आहे. प्रसिद्ध कृष्णाला देखील एक विकेट मिळाली, त्यामुळे त्याचा विचार केला जाणार नाही. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत असल्याने ध्रुव जुरेलचा पत्ता कापला जाऊ शकतो. तर फिरकीची धुरा रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथारकडे असल्याने सारांश जैनला वगळलं जाणं सहाजिकच आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Today Horoscope : या चार राशींच्या आयुष्याचा कायापालट होणार, धन, संपत्ती घरात येण्यास सुरुवात; वाचा राशिभविष्य!
  • एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन
  • पानफुटीची पाने गुणकारी, या 5 आजारांवर रामबाण उपाय, खाताच फरक जाणवतो…
  • NIA ची जुन्नरसह पाच ठिकाणी झाडाझडती, हाती लागला महत्त्वाचा पुरावा? तपासात आढळलं काय? दहशतवादी…
  • मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in