
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 पर्वातील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. या मालिकेवर भारताचं पुढचं गणित अवलंबून आहे. ही मालिका भारतीय संघाला काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. तर आणि तरच पुढचं गणित जुळून येईल. अन्यथा खूपच कठीण आहे. असं असताना या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला ग्रहण लागलं आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. पण या संघासोबत भारताचा स्टार युवा फलंदाज साई सुदर्शन गेला नाही. त्याच्या गैरहजेरीमुळे त्याचा फिटनेसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साई सुदर्शनला पायला दुखापत झाली होती. त्यावर त्याचे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. पण आता कसोटी मालिकेत खेळणार की नाही, याबाबत शंका आहे.
साई सुदर्शन श्रीलंकेत का गेला नाही?
साई सुदर्शन दुखापतग्रस्त होण्यापूर्वी जबरदस्त फॉर्मात होता. इतकंच काय तर श्रीलंका दौरा करणाऱ्या इंडिया ए संघाचा भागा होता. त्याने या मैदानात जबरदस्त कामगिरी केली. त्याने 4 डावात 166.00 च्या सरासरीने 332 धावा केल्या होत्या. त्याच्या फलंदाजीतून 2 शतकंही आली होती. या दरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आराम करण्याशिवाय पर्याय उरला नाही. आता कसोटी संघाचा भाग असेल की नाही याबाबत सस्पेंस आहे. दुखापतीवर योग्य उपचार करण्यासाठी साई सुदर्शन सध्या बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आहे. खरं तर साई सुदर्शनचा श्रीलंकेतील अनुभव भारतीय संघाच्या कामी आला असता. कारण ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे साई सुदर्शन लवकर बरा व्हावा यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत.
रिपोर्टनुसार, साई सुदर्शने सीओईमध्ये फलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे. इतकंच काय तर लवकर बरं वाटण्यासाठी प्रयत्नही सुरू आहोत. रोज नेटमध्ये 75 मिनिटे फलंदाजी करत आहे. पण असं असूनही पूर्णपणे फिट नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर आणि तंदुरूस्त होण्यावर लक्ष ठेवू आहे. नियमानुसार, सीओईच्या वैद्यकीय टीमने त्याला पूर्ण फिट घोषित केलं तर आणि तरच श्रीलंकेत खेळू शकतो.
Leave a Reply