• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: कसोटी मालिकेपूर्वी नको तेच घडलं! साई सुदर्शन दुखापतीमुळे बाद, कोणाला मिळणार संधी?

August 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून होत आहे. पण या मालिकेपूर्वी दोन्ही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. श्रीलंकेचे कुसल मेंडिस आणि पाथुम निसंका दुखापतीमुळे मालिकेला मुकले आहेत. तर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. असं असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून साई सुदर्शन खेळणार की नाही? चर्चा रंगल्या होत्या. त्यात साई सुदर्शन फिट अँड फाईन झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण या मालिकेतील सामन्याला काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

साई सुदर्शन का खेळणार नाही?

साई सुदर्शनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार करत होता. या मालिकेपूर्वी साई सुदर्शन फिट होईल अशी चर्चा होती. त्याने या दरम्यान फलंदाजीचा सरावही सुरू केला होता. पण या मालिकेपूर्वी त्याचं फिट होणं कठीण दिसत आहे. त्यामुळे या मालिकेतून आऊट झाला आहे साई सुदर्शन या मालिकेत खेळणार नसल्याने संघाच्या फलंदाजी योजनेत बदल करणं भाग आहे. साई सुदर्शनमुळे डावखुरा फलंदाजीचा पाया मजबूत असता. पण त्याच्या गैरहजेरीत आता असलेल्या खेळाडूंमध्ये संघांचं संयोजन करावं लागणार आहे.

साई सुदर्शनची जागा कोण घेणार?

साई सुदर्शनच्या गैरहजेरीत देवदत्त पडिक्कलला संघात संधी मिळू शकते. इतकंच काय संघात इतर फलंदाजीचे पर्यायही आहेत. कसोटी मालिकेपूर्वी प्लेइंग 11 बाबत टीम व्यवस्थापत एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. साई सुदर्शन नुकताच इंडिया ए संघाकडून श्रीलंकेत खेळला होता. त्यात त्याने जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. इतकंच काय तर फिरकीचा सामना करताना भारतीय खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता साई सुदर्शनच्या जागी टीम इंडियात बीसीसीआय कोणाला संधी देते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
  • CJP Delhi Protest : ‘कॉकरोच’ पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला…सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?
  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in