• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: सलग पराभवानंतरही श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन सरावातून गायब! नेमकं काय घडलं?

July 6, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना नॉटिंघमच्या ट्रेंटब्रिज येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. असं असताना तिसरा टी20 सामना जिंकावाच लागणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन सरावासाठी उतरले नाहीत. नॉटिंघममध्ये उपस्थित असलेल्या भारतीय पत्रकारांच्या रिपोर्टनुसार, दोन्ही खेळाडू सरावासाठी मैदानात उपस्थित नव्हते. या सामन्यापूर्वी दोघांनी आराम करण्याचा निर्णय घेतला असावा असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.

संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर कुठे गेले?

भारतीय संघाची बस ट्रेंट ब्रिजमध्ये पोहोचली तेव्हा खेळाडू एक एक करून बसमधून उतरले. पण या बसमध्ये श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन हे खेळाडू नव्हते. दोघं या बसमध्ये नसल्याने दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली. प्रश्न असा आहे की, हे दोन्ही खेळाडू तिसऱ्या टी20 सामन्यात खेळणार नाही का? कारण मागच्या सामन्यात संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली होती. तर श्रेयस अय्यरला मागच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो फिट नाही असं बोललं जात आहे. त्यामुळेच सरावासाठी आला नाही का? असाही प्रश्न आहे. श्रेयस अय्यर तिसऱ्या टी20 सामन्याला मुकला तर टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. कारण मागच्या दोन सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली आहे.

टीम इंडिया अडचणीत

आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. पहिला सामना रद्द झाला आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्यासाठी आणि विजयासाठी सलग तीन सामने जिंकावेच लागतील. अन्यथा कठीण होईल. मागच्या सामन्यात 190 धावा करूनही भारतीय संघाला त्याचा बचाव करता आला नाही. त्यामुळे ट्रेंट ब्रिजवर सामन्यात काय होते? याकडे लक्ष लागून आहे.

इंग्लंडचा संघ सज्ज

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. त्यांनी 24 तासाआधीच संघ जाहीर केला आहे. मागच्या सामन्यातील संघच मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन – फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रुक, जेकब बेथेल, टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, जोश टंग आणि आदिल रशीद.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धेत किती जेतेपदं मिळवली? भारत आकडेवारीत कुठे? वाचून तुम्हाला धक्काच बसेल
  • भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं
  • ITR भरताना FD चे व्याज लपवलेय? सावधान, 50 टक्के अतिरिक्त दंडासह खिशाला बसेल मोठा फटका
  • भारतातील सर्वात मोठ्या IPO ची उलटी गिनती सुरू! हुंडईचा रेकॉर्ड तोडण्यासाठी NSE ची जगभर मोहीम
  • श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची बैठक संपली, चंपत राय यांचा राजीनामा मंजूर; कृष्ण मोहन नवे अंतरिम महासचिव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in