
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यांची मालिकेत अनेक बदल पाहायला मिळाले. संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, आता उद्या तिसरा सामना खेलणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात वैभव सूर्यवंशीचा डेब्यू झाला. वैभवचे पदार्पण लवकरात लवकर व्हावे अशी सगळ्यांची इच्छा होती. वैभवचे पदार्पण व्हावे अशी मागणी अनेक दिग्गज खेळाडूंनी केली होती. अखेर बीसीसीआयने तो निर्णय घेतला आणि त्याला संघात आणले. वैभवला संधी दिली म्हणजे संजू सॅमसमनचा पत्ता कट झाला. वैभवला संघात घेण्यासाठी आधी संजूची प्रचंड समजूत काढावी लागली असं पाहायला मिळत आहे. संजूने टी-20 विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली होती तरीही वैभवसाठी संजूलाच संघातून वगळण्यात आले. आता यादरम्यान संजू आणि गंभीर यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
संजू सॅमसन हा असा खेळाडू बनला आहे, जो सतत संघात आत-बाहेर असतो. त्याने भारतासाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे असूनही त्याला सतत संघातून वगळले जाते. 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून वगळण्यात आले होते. सलग तीन सामन्यांमध्ये संजू चांगली कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. वैभवच्या पदार्पणाच्या वेळी, संजू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आवाज नाही, परंतु दोघांमधील संभाषणाचा हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
As Vaibhav Suryavanshi replaced Sanju Samson, Gambhir was seen having a long & animated chat with Samson. pic.twitter.com/OVR2FIJsGe
— Varun (@Defending_18) July 4, 2026
वैभवच्या पदार्पणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली, परंतु केवळ तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या सॅमसनला संघातून वगळण्यात आले. विश्वचषक विजयानंतर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजूची खराब कामगिरी होऊनही, प्रशिक्षक संघाने त्याला पाठिंबा दिला. दुसऱ्या सामन्यापूर्वी, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी असेही म्हटले होते की, संघात असे वरिष्ठ खेळाडू आहेत जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्याला इतक्या सहजपणे वगळता येणार नाही. कर्णधार श्रेयस अय्यरनेही असेच मत व्यक्त केले. दुसऱ्या सामन्यात हे सर्व व्यर्थ ठरले आणि तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर संजूला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. जेव्हा वैभवला कॅप मिळत होती, तेव्हा प्रशिक्षक गंभीर आणि सॅमसन यांच्यात एक गंभीर चर्चा सुरू होती.
Leave a Reply