• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: तो एक फोटो समोर आला अन् चाहत्यांची धडधड थांबली, लॉर्ड्समध्ये टीम इंडिया पोहोचताच काय घडलं?

July 19, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार होता. हा रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल असे म्हटले जात होते. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार आहे. रोहितच्या निवृत्तीवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तो निवृत्त होणारच असं ठामपणे सांगितले आहे तर काहींनी तो खेळणार अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आता रोहित निवृत्त होणार की नाही याबद्दल मॅचनंतरच सांगितलं जाईल. पण त्याआधी एक असा फोटो समोर आला जो पाहून सर्वांनाच आनंद झाला.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, भारतीय संघ सरावासाठी लॉर्ड्सवर दाखल झाला होता. यावेळी, रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांसोबत लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये दिसला. ते लोक गप्पा मारताना दिसले, तर पोट धरुन हसतानाही दिसले. आता हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर भारतीय संघ सर्व काही ठीक आहे आणि रोहित निवृत्त होणार नाही असेही म्हटले जात आहे. रोहित शर्मा, गौतम गंभीर, सितांशु कोटक आणि साईराज बहुतुले हे देखील पाहायला मिळाले. आता एक विशेष गोष्ट म्हणजे रोहित निवांत पाहायला मिळाला. तो एन्जॉय करताना दिसला. तर त्यासोबत गंभीरही मस्ती, मजा करताना दिसले. गंभीरला अशा रुपात बघणं हे फार क्वचितच पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

2026 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या बॅटने चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने यावर्षी आठ सामने खेळले असून, त्याची सरासरी केवळ 30 आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त 11 धावा केल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 26 धावा केल्या. या धावांसाठी त्याने 47 चेंडूंचा सामना केला. आतापर्यंत तो लयीत दिसलेला नाही आणि गोलंदाजांनी त्याला खूप त्रास दिला आहे.

पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. तो दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित केला जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त आहेत. इंग्लंडप्रमाणेच येथेही चेंडू सीम आणि स्विंग होतो. दक्षिण आफ्रिकेतील रोहितचा एकदिवसीय विक्रमही अगदी सामान्य आहे. त्याने खेळलेल्या १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 256 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 19.69 आणि स्ट्राइक रेट 68.44 आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • HDFC Bank च्या शेअरमध्ये अचानक मोठी घसरण, गुंतवणूकदारांमध्ये पसरली भीती, काय घडलं?
  • घर पडलंय… बहीण बेपत्ता… नेपाळमध्ये महाप्रलय कसा आला? संकट रोखता आलं असतं? वाचा Special Report
  • ‘ठरलं तर मग’मध्ये धमाकेदार वळण; सायलीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष
  • महाराष्ट्रातल्या या गावात फक्त 6-7 तासांचाच दिवस, तुम्हाला माहित्ये का नाव ?
  • तिच्या नशिबात मृत्यूच नव्हता, नवविहातीने 10 व्या मजल्यावरून उडी मारली पण.., वाचा काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in